आ. आजबे हे अठरापगड जातींना बरोबर घेऊन चालणारे नेतृत्व विधानसभेत पाठवा - आजिनाथ बेलेकर

 आजिनाथ बेलेकरांसह लोणी गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश



आ. आजबे हे अठरापगड जातींना बरोबर घेऊन चालणारे नेतृत्व विधानसभेत पाठवा - आजिनाथ बेलेकर


आष्टी प्रतिनिधी : आष्टी मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आमदार बाळासाहेब आजबे हे योग्य नेतृत्व आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांनी आष्टी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे केले आहेत. त्याचबरोबर ते अठरा पगड जातींना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व असल्याने आपण त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहोत, येणाऱ्या निवडणुकीत आमदार आजबे यांचा विजय निश्चित असून आपले मत आमदार बाळासाहेब आजबेंना 

द्यावे असे आवाहन आजिनाथ बेलेकर यांनी केले.

    तालुक्यातील लोणी सय्यद मीर येथे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कॉर्नर सभेत आ. बाळासाहेब आजबे यांच्या उपस्थितीत अजिनाथ बेलेकर सह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रवेश केला. यावेळी आजिनाथ बेलेकर बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, आमदार बाळासाहेब आजबे यांनी मतदारसंघातील अठरापगड जातीतील लोकांना बरोबर घेऊन मतदार संघाचा विकास केला आहे. सर्वसमावेशक नेतृत्व असलेले आमदार बाळासाहेब आजबे हे येणारे विधानसभा निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकणार आहेत. त्यामुळे सर्व मतदारांनी आपले अमूल्य मत हे आमदार बाळासाहेब आजबे यांना देऊन विधानसभेत पाठवावे असे आव्हान आजिनाथ बेलेकर यांनी केले. यावेळी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आजिनाथ बेलेकर, सुभाष वाळके, बाबासाहेब भिटे, अर्जुन काकडे नितीन मिसाळ, बलभीम काळोखे, सागर चौधरी, शिवम मेरगळ, अशोक कुताल, सागर लाळगे, चंद्रगुप्त खलासे, बन्सी काकडे, भगवान मामा वाळके, राजाभाऊ सायंबर, बीबीशन कराळे,अशोक येरकळ, मंज्याबापू वाडेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.