वाचाळ वीरांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी आ.सुरेश धस समर्थक आक्रमक
*******************************
आष्टीसह मतदारसंघ बंद करण्याचा इशारा ..
**********************************
********************************
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या समर्थकांनी अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांचा प्रचार केल्यामुळे दुखावलेल्या आमदार सुरेश धस यांनी आमदार पंकजा मुंडे यांनी असे करावयास नको होते असे वक्तव्य विजयी सभेमध्ये केल्यानंतर आमदार पंकजा मुंडे समर्थकांनी आमदार सुरेश धस यांचे कुटुंबीयांवर अत्यंत खालच्या पातळीमध्ये टीका टिपणी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे आमदार सुरेश धस यांचे समर्थक आक्रमक झाले आणि त्यांनी या वाचाळवीरांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करावी अन्यथा संपूर्ण मतदारसंघातील गावांमध्ये बंद करून निषेध व्यक्त करण्यात येईल असा इशारा आमदार सुरेश धस यांचे समर्थकांनी दिला आहे.
आष्टी पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की,आ.सुरेश धस यांचा विक्रमी मताने विजय झाल्यानंतर भा.ज.पा.च्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी विरोधी उमेदवाराला मदत करून पराभव करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला सोशल मीडियावर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी आमदार सुरेश धस यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका टिपणी करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आष्टी पोलीस स्टेशन येथे समर्थकांनी घोषणाबाजी करत जाहीर निषेध व्यक्त करत आमच्या दैवताबाबत वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करून २४ तासाच्या आत अटक करावे अन्यथा तीव्र आंदोलन करत आष्टी शहरासह मतदार संघातील गावागावात बंद पाळण्याचा इशारा समर्थकांनी दिला असून आष्टी पोलीस स्टेशनचे निरीक्षक शरद भुतेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. दलित,आदीवासी,भटके विमुक्त,वंचीत,बहुजन समाजाचे नेते आ.सुरेश धस यांच्या कुटुंबीयावर राजकीय द्वेषापोटी अश्लिल भाषेत बोलुन तो व्हीडीओ व्हायरल करून आ.सुरेश धस यांची बदनामी केलेली आहे.भावना दुखवल्या आहेत. त्यामुळे अशा वक्तव्य करणाऱ्या सर्व संबंधीतांवर सायबर अॅक्टनुसार गुन्हे दाखल करून अटक करावी.भारतीय संविधानाने कलम १९ नुसार अभिव्यक्ती स्वतंत्र दिले आहे. त्यानुसार आमदार सुरेश धस यांनी विजयी सभेत संवैधानिक भाषेत आपले मत व्यक्त केलेले आहे. परंतु पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते समर्थक समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे कृत्य करत आहेत.महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांबद्दल बोलताना जी संस्कृती व परंपरा घालून दिलेली आहे त्याच महाराष्ट्रात महिलेबद्दल असे अश्लील भाषेत बोलणाऱ्या गावगुंडावर तात्काळ गुन्हे दाखल करन अटक करावी अन्यथा आष्टी तालुका बंदची हाक देत आहोत.तात्काळ कारवाई न झाल्यास होणाऱ्या परिणामाची जबाबदारी प्रशासनावर राहील याची नोंद घ्यावी असे निवेदनात नमूद केले आहे यावेळी पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected