*वडवणी येथे मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आरोग्य शिबीराचे आयोजन*
*- मयुरेश्वर हॉस्पिटलमध्ये होणार तपासणी*
*वडवणी / प्रतिनिधी*
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मराठी पत्रकार परिषद स्थापना दिनानिमित्त वडवणी मध्ये पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या आदेशाने आणि मराठी पत्रकार परिषद सलग्न डिजिटल मीडिया परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी पत्रकार परिषद शाखा वडवणी आणि डॉ.विजयकुमार निपटे यांच्या मयुरेश्वर रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने येत्या ३ डिसेंबर २०२४ रोजी वडवणी येथील पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबीर सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत बीड परळी हायवे रोडवर असलेल्या मयुरेश्वर हॉस्पिटल येथे ठेवण्यात आले असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषद शाखा वडवणी यांच्या वतीने देण्यात आली आहे.
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभरात ३ डिसेंबरला दरवर्षी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात येते. या शिबीरात पत्रकार आणि त्यांच्या कुटूंबीयांची आरोग्य तपासणी केली जाते. या वर्षी वडवणी येथील डॉ विजयकुमार निपटे यांच्या मयुरेश्वर हॉस्पिटल मध्ये १० ते २ या वेळेत होणार आहे. या शिबीरामध्ये रक्तदाब, मधुमेह, इसीजी, रक्त गट आदींची तपासणी होणार आहे. तरी सर्व पत्रकारांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान मराठी पत्रकार परिषद शाखा वडवणी आणि डॉक्टर विजयकुमार निपटे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
stay connected