विकास कामांसह, लोकांशी आपुलकीच नातं जपावं लागतं तेव्हा मते मिळतात --- सुरेश धस

 विकास कामांसह, लोकांशी आपुलकीच नातं जपावं लागतं तेव्हा मते मिळतात
--- सुरेश धस

*************************

गाव भेट दौऱ्यात गावागावात जंगी स्वागत तर अनेक युवकांचा भाजपात प्रवेश

******************************







******************************

आष्टी (प्रतिनिधी)

केवळ विकास कामांबरोबरच माय बाप जनतेशी आणि कार्यकर्त्याशी आपुलकीचे नातं जपावं लागत सुखदुःखात उभा उपस्थित राहावे लागते.. असे प्रतिपादन आष्टी विधानसभा भाजपा,शिवसेना, रिपाई आठवले गट व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सुरेश धस यांनी केले. 

ते आष्टी तालुक्यात शुक्रवारी गाव भेट दौऱ्यात बोलत होते.

पुढे बोलताना धस म्हणाले, कोरोना काळात विरोधी उमेदवाराच्या गावातले ५५ लोक गेले इतके निष्क्रिय काम त्यांनी केले.त्यांचे आमदारकीचे पाच वर्षात केले तुमचं या भागातील ते आहेत कधी तुमच्या सुखदुःखात आले आहेत का? नुसत्या विकासावर मते मिळतात असे नाही त्यासाठी लोकांशी आपुलकी आणि नातं जपावं लागतं अशी टीका उमेदवार सुरेश धस यांनी कानडी बुद्रुक येथे केली. दुसरे माजी आमदार 1978 पासून भीमराव धोंडे निवडणुका लढवतात आहेत तरी त्यांच मन भरत नसून निवडणुका लढवण्याचा त्यांच्या संस्थेतील कर्मचारी यांच्या पगारावर त्यांचा पाया भक्कम असल्याने ते निवडणूकीत फायद्यांत राहत असल्याचे टोला सुरेश धस यांनी केली. शुक्रवार दि.१५ नोव्हेंबर रोजी वाकी,कानडी (बु.),फत्तेवडगाव,नांदा,टाकळी, सराटेवडगाव,पिंपरी (घु.),वाहिरा,निमगाव (बो.),घोंगडेवाडी या गाव भेट दौरा उमेदवार सुरेश धस यांनी करत मतदारांशी संवाद साधला.



सुरेश धस यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्त्यांचे भाजपात प्रवेश

************************



**************************

आष्टी,पाटोदा,शिरूर कासार तालुक्यातील कार्यकर्त्यांनी माजी मंत्री सुरेश धस यांच्या उपस्थितीत भाजपचा सर्वसमावेशकतेचा विचार स्वीकारत वटनवाडी, कोहिनी,मंगरूळ, पाटण,लोणी सय्यदमीर,फत्तेवडगाव,गितेवाडी, नाळवंडी,उंदरखेल,पाटोदा शहर प्रत्येक गावांतील शेकडो कार्यकर्त्यांनी सुरेश धस नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात जाहिर प्रवेश केला.



मी सुरेश धस सोबतच 
---- अशोक चौधरी


टाकळी अमिया येथील असलेले आमच्यातील गट तट विसरून आपला माणूस म्हणून ह्या निवडणुकीत त्यांच्यासोबत राहणार आहे असल्याचे उधोजक अशोक चौधरी म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.