मेहबूब भाई शेख यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या - भाऊसाहेब मेटे
आष्टी (प्रतिनिधी)
मेहबूब भाई शेख हा सर्वसामान्य कुटुंबातील माणूस असुन त्यांच्या अथक परिश्रमाने व पक्षनिष्ठेमुळे त्यांना पवारसाहेबांनी आष्टी पाटोदा शिरूर तालुक्याची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे जात धर्म पंथ बाजूला ठेवून सर्वांनी मेहबूब भाई शेख यांना मतदान रुपी आशिर्वाद देऊन प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन भाऊसाहेब मेटे व बापूराव गावडे, यांनी केले आहे. आम्ही सर्व तुमच काम करायला उत्सुक आहोत अशी मतदारसंघात फिरत असताना गावकऱ्यांनी इच्छा व्यक्त केली. मेहबूब शेख यांनी मी त्यांचं स्वागत करतो आणि मला तुमची सेवा करण्याची संधी द्या. कमीत कमी 20000 युवकांना रोजगार मिळेल अशी एमआयडिसी आणि शेतकऱ्यांसाठी एक ऊस कारखाना पवार साहेबांनी आष्टीतील सभेत माझ्या व परमेश्वर काका शेळके, सुनिल नाथ, भाऊसाहेब मेटे, राम खाडे, दादासाहेब झांजे, आण्णासाहेब चौधरी, अमोल तरटे, डॉ. शिवाजी राऊत, राहुल काकडे, शिवाजी सुरवसे, सर्वांच्या विनंतीवरून साहेबांनी ऊस कारखाना व कमीत कमी 20000 युवकांना रोजगार मिळेल अशी एमआयडीसी करु असा शब्द दिला आहे. मी तालुक्यातील प्रत्येक गावच्या विकासासाठी कटिबध्द असेल आणि निश्चितच आपल्या सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि गावचा विकास करण्यासाठी तत्पर असेल. असे आश्वासन देतो. मतदारसंघाच्या विकासासाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी 'तुतारी वाजवणारा माणूस' या चिन्हासमोरील बटण दाबून मला मतदान रुपी आशिर्वाद देऊन आपणा सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन मी आपणा सर्वांना करतो.! असे आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केले.
stay connected