बीड जिल्ह्यातील भाजपाचे भवितव्य काय ? पंकजाताई मुंडे यांचा "आदेश " आणि सुरेश धस यांनी व्यक्त केलेली "खदखद " यामुळे भाजप प्रेमी मतदारांमध्ये चिंता

 बीड जिल्ह्यातील भाजपाचे भवितव्य काय ?
पंकजाताई मुंडे यांचा "आदेश " आणि सुरेश धस यांनी व्यक्त केलेली "खदखद " यामुळे भाजप प्रेमी मतदारांमध्ये चिंता




आष्टी (प्रतिनिधी)


भारतीय जनता पार्टी बीड जिल्ह्यामध्ये तळागाळात सर्वसामान्य नागरिकात पोहोचवण्याचे काम खऱ्या अर्थाने स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी केले आहे जनसंघापासून भारतीय जनता पार्टी पर्यंतचा प्रवास अनेक लोकांनी अनुभवला आहे बीड जिल्ह्यातील मतदार हे अत्यंत सूज्ञ आणि हुशार समजले जातात याच बीड मतदारसंघांमध्ये कम्युनिस्ट,  काँग्रेस, जनता दल आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार निवडले गेले एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये गोपीनाथराव मुंडे राजकारणात आल्यापासून त्यांनी अति अत्यंत परिश्रम करून सर्व जाती-धर्मांमध्ये सतत संपर्क ठेवून आपल्या स्वतःच्या स्वभाव कौशल्यावर भारतीय जनता पार्टी ग्रामीण भागात पोहोचवली पंधरा-वीस वर्षाच्या अथक परिश्रमानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये संघर्ष यात्रा काढून तात्कालीन काँग्रेस पक्ष जेरीस आणला आणि प्रमोद महाजन यांच्या बुद्धिमान, धूर्त, चाणक्य नीति ने महाराष्ट्रात शिवसेनेला बरोबर घेऊन सत्ता स्थापन केली 1995 साली गोपीनाथ मुंडे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आणि भारतीय जनता पार्टी सर्व महाराष्ट्रभर तळागाळात पोहोचली या अपूर्व कामगिरीमुळे गोपीनाथराव मुंडे सर्व समावेशक नेतृत्व म्हणून पुढे आले त्यांनी इतर मागासवर्गीय समाजातील माळी धनगर आणि वंजारी यांचे बरोबरच बंजारा या भटक्या विमुक्त समाजाला बरोबर घेत मुस्लिम समाजाचाही विश्वास संपादन केला होता असे असताना मराठा समाजामध्ये देखील त्यांनी आपले नेतृत्व गुण सिद्ध करताना मराठा समाजाला राजकीय पदे दिली गेवराई चे पंडित, धारूर चे आडसकर, माजलगाव चे सोळंके आष्टीचे धस, आजबे यांना राजकीय ताकद दिली आणि त्यांनी केंद्रीय पातळीवरील नेतृत्व करण्यास सुरुवात केली आणि ते दोन वेळा खासदार झाले त्यावेळेस सर्व जाती धर्मातील मतदारांनी त्यांना स्वीकारले होते मात्र राजकारणामध्ये त्यांच्या घराण्यामध्ये फुट पडली आणि धनंजय मुंडे हे नेतृत्व पुढे करण्यात आले केंद्रात सत्ता स्थापन होऊन गोपीनाथराव मुंडे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री झाले असताना त्यांच्या अचानक जाण्याने बीड जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीवर मोठे संकट असताना पंकजाताई मुंडे यांनी स्वतः धाडसाने पुढे येऊन नेतृत्व करण्यास सुरुवात केली स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा समर्थ वारसा लाभला खरा परंतु गोपीनाथरावांसारखे डावपेच आणि राजकीय पॉलिसी यामध्ये पंकजाताईंना मर्यादा असल्याचे जाणवले पंकजाताई राज्यात राजकारणात असल्यामुळे पण प्रीतम यांना खासदार व्हावे लागले 

बीड जिल्ह्यातील जनतेने त्यांना स्वीकारले मात्र 

2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवामुळे  प्रीतम मुंडे यांचे जागी पंकजा ताईंना लोकसभेमध्ये उमेदवारी देण्यात आली त्यातच मराठा आरक्षणाचे आंदोलन जोर धरू लागले होते आणि ओबीसींच्या नेते असलेल्या पंकजाताईंची फार मोठी कसरत झाली मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीला मतदान होऊनही अल्प मताने त्यांना पराभव स्वीकारावा लागला या पराभवाला अनेक कारणे होती त्यामध्ये खासदार प्रीतम यांनी मतदारसंघाकडे  दुर्लक्ष करून लोकांशी संपर्क ठेवला नाही, जरांगे पाटलांच्या प्रभावामुळे मराठा मुस्लिम आणि ओबीसी यांच्यामध्ये दरी निर्माण होऊन अल्पमताने त्यांचा पराभव झाला पंकजा मुंडे या भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव असल्याने त्यांचे भोवती प्रतिष्ठेचे वलय होते मात्र त्यांच्या सतत अवतीभवती असलेल्या लोकांनी त्यांना ज्या लोकांनी भारतीय जनता पार्टी वाढवण्यामध्ये खस्ता खाल्ल्या आहेत त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते,  विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते  बजरंग दलाचे कार्यकर्ते, विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते यांच्या जिल्हाभरातील विविध गावांमधील असलेल्या या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांशी त्यांचा संपर्क या कार्यकर्त्यांनी येऊ दिला नाही असे बोलले जाते पंकजा मुंडे यांच्या प्रत्येक दौऱ्यामध्ये ही टीम त्यांच्या बरोबर जात असे आणि ठराविक एकच कार्यकर्त्याच्या घरी उठबस असल्यामुळे अनेक जण नाराज होते परंतु ते बोलून दाखवत नव्हते त्यांना त्यांच्याशी बोलण्याची संधी कधीही मिळाली नाही महाराष्ट्र राज्यातील राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस आणि पंकजाताई मुंडे यांचे एकमेकांशी जमत नाही असा संदेश जात असल्यामुळे कार्यकर्त्यांनी नेमके काय करायचे ? याचा बोध होत नसल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे संघटन वाढले नाही व्यक्तिगत नेतृत्वावर कोणतीही राजकीय पार्टी वाढत नसते, वाढली तरी ती चिरकाल टिकत नसते भा.ज.पा.पक्ष संघटने कडे पंकजा मुंडे यांनी कधीही लक्ष दिले नाही एकेकाळी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेचे तिकीट वाटप होत असताना या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला केज हा मागासवर्गीय मतदार संघ घाला आणि पाच मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना देण्यात आले मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आष्टी हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी साठी मिळवला उमेदवारीचे  दावेदार म्हणून सुरेश धस आणि माजी आमदार भीमराव धोंडे हे आपापल्या परीने प्रयत्न करत होते अखेर पार्टीच्या वाढीसाठी पार्टीच्या आदेशानुसार घेण्यात आलेले उपक्रम आणि पार्टीचे रचनेनुसार घेण्यात आलेले कार्यक्रम आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे निवडून येण्याची क्षमता या निकषावर सुरेश धस यांनी भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळवली पंकजाताई मुंडे या राष्ट्रीय सचिव असल्यामुळे एकदा उमेदवारी मिळाल्यानंतर केज आणि आष्टी या दोन्हीही उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी निश्चितपणे त्यांच्यावरच असताना यापूर्वी कधीही घडलेले नाही असे काही प्रसंग घडले आणि ऐन प्रचाराच्या काळामध्ये केज येथे प्रचार सभेमध्ये फक्त हीच जागा माझी आहे असे सांगितल्याने संघर्षाची ठिणगी पेटली आणि सुरेश धस यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेमध्ये उमेदवाराचे नाव आणि त्याचे निवडणूक चिन्ह यांचा उल्लेख न करता महायुती च्या उमेदवाराला विजयी करा विचार करून मतदान करा असा संदेश दिला तर कडा येथील जाहीर सभेमध्ये कार्यकर्त्यांना कामाला लागा आणि विचार करून मतदान करा असा संदेश दिला मतदानाच्या एक दिवस अगोदर मात्र ओबीसी असलेले भीमराव धोंडे यांचे काम करा असे अनेक फोन मतदार संघातील विशिष्ट वर्गातील मतदारांना येऊ  लागले लोकसभेतला बदला घ्यायचा आहे असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांना मतदान द्यावे असा प्रचार करू लागले असे दिसून येताच मराठा समाजामध्ये सुरेश धस हे गेली दहा वर्ष आमदार  नाहीत तरीही सतत संपर्कात राहून लोकांची कामे करत असून देखील त्यांना निवडणुकीत पाडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येतात मराठा समाजातील अनेक लोक एकत्रित आले आणि त्यांनी बाळासाहेब आजबे यांची उमेदवारी ही सुरेश धस यांचे मतदान कमी करण्यासाठी देण्यात आली आहे असा पक्का समज करून घेण्यात आल्यामुळे सुरेश धस यांना पाठिंबा वाढला आणि त्याचा परिणाम मोठ्या मताधिक्याने त्यांचा विजय झाला निवडणूक प्रचार काळामध्ये सुरेश धस हे आपले उमेदवार नाही ते फडणवीस यांची उमेदवार आहेत असा प्रचार पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते करत होते तर अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांचे कार्यकर्ते देखील हे फडणवीस यांचे उमेदवार आहेत असा मराठा समाजामध्ये प्रचार करत होते सुरेश धस यांना जेरीस आणण्याचा हा प्रकार सर्वसामान्य मराठा आणि इतर समाजातील सुरेश धस यांचेवर प्रेम करत असलेल्या मराठा आणि ओबीसी सह सर्व जाती-जमातीतील मतदारांना आवडला नाही मतदारांमध्ये सहानुभूतीची प्रचंड लाट आली आणि सुरेश धस यांना मोठ्या मताधिक्याने ही निवडणूक जिंकता आली. विजयी सभेमध्ये सुरेश धस यांनी भारतीय जनता पार्टीच्या जबाबदार पदाधिकारी असलेल्या पंकजा मुंडे यांनी अपक्ष उमेदवाराला दिलेला पाठिंबा आणि त्याचा अप्रत्यक्ष केलेला प्रचार त्यामुळे झालेला मानसिक त्रास यामुळे त्यांनी मनातील खदखद व्यक्त केली आणि पंकजाताई तुम्ही असे करायला नको होते मी तुम्हाला निवडण्यासाठी फार परिश्रम घेतले असून तुम्ही कोणाची तरी ऐकून माझ्या विरोधात प्रचार केला ही ही गोष्ट मला दुखावणारी होती माझा राजकीय बळी घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला ही अत्यंत वेदनादायी घटना असल्याचे सांगत त्यांनी त्यांचे मन मोकळे केले याचा परिणाम मात्र ज्या ओबीसी  मतदारांनी सुरेश धस यांना मतदान केले होते त्यांना आवडले नाही कारण या मतदारांना नेमके राजकारण काय झाले आहे याची माहिती होण्यासाठी वेळ लागणार आहे परंतु पंकजा मुंडे विरुद्ध सुरेश धस असे चित्र या प्रकारामुळे पाहावयास मिळत आहे सुरेश धस हे गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झालेले नेतृत्व असून त्यांचा अत्यंत बारकाईने अभ्यास असतो आणि समाजातल्या अत्यंत तळागाळापर्यंत संपर्क असल्यामुळे त्यांचे नेटवर्क हे अत्यंत चांगले असल्यामुळे त्यांचा पराभव झाला नाही मात्र भारतीय जनता पार्टीमध्ये चाललेला हा सावळा गोंधळ पाहून  भारतीय जनता पार्टी प्रेमी असलेल्या मतदार मात्र दुःखी आणि अचंबित झालेला आहे राज्याचे राजकारण करणाऱ्या पंकजा मुंडे आणि पाचव्यांदा निवडून आलेले वरिष्ठ नेतृत्व सुरेश धस यांच्यातील हा संभाव्य संघर्ष भारतीय जनता पार्टीसाठी मोठे आव्हान असून बीड जिल्ह्यातील भाजपमध्ये चालले तरी काय असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे बीड जिल्ह्यामधील भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा  बलवान होण्यासाठी प्रदेश पातळीवरील भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आता काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

*****************************

सुरेश धस भाषणा दरम्यान भावूक

*****************************



आष्टी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच विजयी सभा आष्टीत पार पडली.यावेळी सुरेश धस यांनी प्रचार दरम्यान पडद्या मागे जे घडले ते बोलून दाखवले.यामध्ये ते म्हणाले की मी लोकसभेत एवढं प्रामाणिक काम करून ही मला पाडण्याचा पर्यत केला जातो.मी ज्यांना संपूर्ण निवडणुकीत नेत्या म्हणून त्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनीच मलाच पाडण्याचा प्रयत्न केल्याने याचेच मनात दुःख असल्याचे बोलत कंठदाटून आल्याने रांगड व्यक्तिमत्त्व असलेले सुरेश धस भाषणात भावुक झालेले यावेळी पाहायला मिळाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.