महेबूब शेख यांच्या प्रचारार्थ खा.सुप्रिया सुळे यांची कडा येथे जाहीर सभा नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - डॉ. नदीम शेख
आष्टी/ प्रतिनिधी - सध्या विधानसभेच्या प्रचाराचे वारे जोरात वाहताना दिसत आहेत. यातच आष्टी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार महेबूब शेख यांच्या प्रचारार्थ संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दि.१५/११/२०२४ रोजी कडा येथे मौलाली बाबा दर्गा मैदानावर दुपारी ३.३० वा. प्रचारसभा होणार आहे. तरी मतदार बंधू भगिनी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या सभेस उपस्थित राहावे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके, बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांची प्रमुख उपस्थित असणार आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघातील मतदार तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रा.काँ पार्टी चे डॉ. नदीम शेख यांनी केले आहे.
stay connected