२०१९ ची ७१ हजाराची लीड ३२ हजारावर का घसरली ?
----------------------------------------
आष्टीतुन अपेक्षित मताधिक्य मिळाले असते तर पंकजाताई जिंकल्या असत्या! माजी आ.भीमराव धोंडे समर्थकांचा प्रश्न
------------------------------------
------------------------------------
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी विधानसभा मतदार संघामधून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या खा.प्रीतमताई मुंडे यांना ७१ हजार मताधिक्य मिळाले होते.ते २०२४ ला ३२ हजारापर्यंत का घसरले ? असा प्रश्न विचारत मतदार संघातील मुंडे समर्थक कार्यकर्ते माजी जि.प.सदस्य रामदास बडे, रामराव खेडकर,पांडुरंग नागरगोजे आणि विष्णू दहिफळे यांनी आष्टीतून तीन प्रमुख नेते बरोबर असताना अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही म्हणूनच पंकजातईचा पराभव झाला असा आरोप केला.
याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की, २०१९ ला लोकसभेला मिळालेले मताधिक्य पाहता यावेळीही आष्टीतून २०१९ प्रमाणेच किमान ५० हजाराचे मताधिक्य मिळायला हवे होते. २०१९ ला निवडणुकीत भीमराव धोंडे व सुरेश धस हे दोन आमदार भाजप सोबत होते.तरीही ७१ हजाराचे मताधिक्य मिळाले. यावेळी तर महायुती होती.त्यांच्या मदतीला आ.बाळासाहेब आजबे हेही होते मग असे का झाले असे ते म्हणाले.यावेळी मिळालेले मताधिक्य कमी असले तरी ते आपल्यामुळेच मिळाले असा दावा प्रत्येक नेता करत असला तरी ते कोणामुळे मिळाले ? याचे उत्तर गावोगाव झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहिली की लक्षात येते असे म्हणत त्यांनी ती यादीच समोर ठेवली. ते म्हणाले की, उदाहरणाअर्थ आष्टी तालुक्यातील हरीनारायन आष्टा हा जि.प.गट " कोणाचा गड " आहे. हे संपूर्ण मतदारसंघ जाणतो.तेथे निवडून येणारा जि.प.सदस्य कोण असतो? आणि तो प्रत्येकवेळी ७ ते ८ हजाराच्या मताधिक्याने निवडून येतो मग या लोकसभा निवडणुकीतच या गटातून मिळणारे मताधिक्य ४०० पर्यंत कसे ? आणि का घसरले ? असाही प्रश्न त्यांनी विचारला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, लोकनेत्या पंकजाताईचा निसटता पराभव हा शेवटच्या टप्यातील मतमोजणीत झाला,मतमोजणी पाटोदा तालुक्यातील गावामध्ये आली असता पंकजाताईना मताधिक्य होते परंतु पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही,वैजाळा, तांबाराजुरी,सोनेगाव,सौंदाणा, दासखेड,पारगाव,नफरवाडी, मंगेवाडी,पाचेगाव आणि पाचंग्री आदी गावात मतमोजणी पोहचली तेव्हा पंकजाताईचे मताधिक्य घटले आणि पंकजाताईचा पराभव झाला. ही गावे मतदार संघात कोणाचे नेतृत्व मानतात ? हे सगळा मतदारसंघ जाणतो,मग येथेच मताधिक्य कसे घटले? आणि त्यामुळेच हा निसटता पराभव पंकजाताईना स्वीकारावा लागला. मग मतदार संघातून मिळालेले मताधिक्य माझ्यामूळेच मिळाले असा दावा कोणी कसा करू शकतो ? असे ही त्यांनी विचारले.
------------
हरिनारायण आष्टा
गटात मताधिक्य कमी का?
-----------------------------------
आष्टी तालुक्यातील हरीनारायण आष्टा हा जि.प.गट कोणाचा गड आहे हे संपूर्ण मतदारसंघ जाणतो. तेथे निवडून येणारा जि.प.सदस्य कोण असतो ? आणि तो प्रत्येकवेळी ७ ते ८ हजाराच्या मताधिक्याने निवडून येतो मग या लोकसभा निवडणुकीतच या गटातून मिळणारे मताधिक्य ४०० पर्यंत कसे आणि का घसरले?
या गावात मताधिक्य घटले
------------------------------------
पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही, वैजाळा,तांबाराजुरी, सोनेगाव,सौंदाणा,दासखेड, पारगाव,नफरवाडी,मंगेवाडी, पाचेगाव आणि पाचंग्री आदी गावात पंकजाताईचे मताधिक्य घटले आणि पंकजाताईचा पराभव झाला. ही गावे मतदार संघात कोणाचे नेतृत्व मानतात ? मग येथेच मताधिक्य कसे घटले? असा प्रश्न त्यांनी विचारला.
stay connected