आचारसंहिता भंगची मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांच्याकडे मेहबूब शेख यांची तक्रार
आष्टी प्रतिनिधी- 231 आष्टी विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रक्रियेत आष्टी तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर इ डी सी मतदान होत असताना दबाव तंत्राचा वापर झालेले मतदान रद्द करून मतदान केंद्रावर ईव्हीएम द्वारे घेणे बाबत अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे उमेदवार महेबूब इब्राहिम शेख यांनी शनिवार दिनांक 16 नोव्हेंबर 2024 रोजी मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांच्याकडे आचारसंहिता भंग ची तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की निवडणूक प्रक्रियेत 231 आष्टी विधानसभा मतदार संघात नियुक्त केलेले अधिकारी सत्ताधारी पक्षाचे माजी आमदार सुरेश धस यांनी केलेले असल्याचा आरोप महेबुब शेख यांनी केला आहे. निवडणूक विभागात व सर्व प्रक्रियेत कार्यरत कर्मचारी अधिकाऱ्यांच्या संगनमताने मर्जीतील अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली दिसून येत आहे. 231 आष्टी विधानसभा मतदार संघाची निवडणूक 2024 ही पारदर्शक होईल असे वाटले होते. आष्टी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ह्या कर्तबगार महिला अधिकारी असल्याने त्यांच्यावर विश्वास होता. परंतु कार्यकर्ते असलेले नौकर व तहसील कार्यालयात निवडणूक कार्यालय धस यांना मानणारे असल्याने निवडणूक कामाच्या प्रत्येक कक्षावर आरोपीताचे नियंत्रणाने चालत असल्यामुळे वक्त अधिकारी अडचणीत येत असल्याचे दिसते. तरी इ डी सी चे झालेले सर्व मतदान रद्द करून झालेले संपूर्ण इ डी सी मतदान प्रक्रिया ही त्या त्या मतदान केंद्रावर ईव्हीएम द्वारे करून घ्यावी असे उमेदवार महेबुब शेख यांनी मुख्य निवडणूक अधिकारी मंत्रालय मुंबई यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
stay connected