अभयराजे धोंडे यांनी सुरू केलेल्या प्रत्यक्ष मतदार भेटीला उत्स्फूर्त प्रतिसाद

आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या प्रचारार्थ युवा नेते अभयराजे धोंडे यांनी सुरू केलेल्या प्रत्यक्ष मतदार भेटीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असुन ठिकठिकाणी अभयराजे धोंडे यांचे जोरदार स्वागत होत आहे ‌ 



        आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या  सौभाग्यवती सौ. दमयंतीताई धोंडे, सुनबाई अक्षता अजय धोंडे,चिरंजीव अजयदादा धोंडे, अभय राजे धोंडे हे सर्वच निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. आपापल्या परीने वेगवेगळ्या गावात जाऊन प्रचार करीत आहेत.‌ युवा नेते अभयराजे धोंडे मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन मतदारांना मतपत्रिका देऊन भीमराव धोंडे यांच्या शिट्टी चिन्हाला मत देण्याचे आवाहन करीत आहेत. अभयराजे धोंडे यांचे प्रत्येक गावात मतदार राजाकडून जोरदार स्वागत होत आहे. लाडक्या बहिणीकडून औक्षण करणे, कार्यकर्त्यांनी भेटा बांधून पुष्पहार देऊन जोरदार स्वागत केले जात आहे.

गावागावात जाऊन व्यापारी, लहान मोठे दुकानदार, घरोघरी जेष्ठ नागरिक, तरुण वर्ग, शेतात काम करणारे शेतकरी, बांधकाम करणारे मजूर,आजी - आजोबा तसेच लाडक्या बहिणींना भेटून मतपत्रिका तसेच बॅलेट मशिन दाखवून शिट्टी या चिन्हाला मतदान करण्याचे करीत आहेत. आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनीच ही निवडणूक हातात घेतल्याने तसेच प्रत्येक कार्यकर्ता मनापासून प्रचार करीत असल्याने अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.