खुंटेफळ साठवण तलाव पुनर्वसन,राहिलेले भूमि अधिग्रहण पुर्ण करण्याची क्षमता,धमक ज्या उमेदवारात आहे जनतेने त्यानाच निवडून द्यावे- प्रदिप भैया थोरवे
पहिल्या पाच वर्षातील आणि पुढे १० वर्षात झालेल्या कामाची तुलना जनतेनेच करावी.
आष्टी-निवडणुकीचे वारे राज्यभर चालू असताना आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळत आहे. वेगवेगळे आरोप प्रत्यारोप उमेदवार करत असताना आम आदमी पार्टी चे प्रदेश संघटनमंत्री प्रदिप थोरवे यांनी खुंटेफळ साठण तलाव जो उमेदवार पुढच्या पाच वर्षात पूर्ण करू शकेल असा उमेदवार निवडून देण खूप गरजेचं आहे असे मत व्यक्त केले आहे.खुंटेफळ साठवण तलाव पूर्ण झाला तर संपूर्ण आष्टी तालुका सुजलाम सुफलाम होईल तोच खरा विकास मतदारसंघाचा असेल. आणि ते राहीलेल काम करणारा व्यक्ती हा क्षमता असणारा असावा कारण तालुक्याच भल होत असताना खुंटेफळ,सोलापूरवाडी व कुंभेफळ हे गावे मात्र विस्थापित होत आहेत येथील शेतकऱ्यांचा रोष आहे त्या शेतकऱ्यांशी चर्चा करून त्याना जास्तीत जास्त त्यांच्या जमिनीला तेथे असलेले फळझाडे,घरे यांना योग्य भाव देऊन शेतकऱ्यांच समाधान करून जमीन हस्तांतरित करून २ गावांचे पुनर्वसन होणे गरजेचं आहे. तलाव सुरू होऊन आता १५ वर्ष होत आले,परंतु पहिल्या टप्प्यात जे काम झाले ते मागच्या १० वर्षात झाले नाही. पहिल्या पाच वर्षातील आणि पुढे १० वर्षात झालेल्या कामाची तुलना जनतेनेच करावी. यासाठी लोकप्रतिनिधी हा तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्याच स्वप्न बाळगणारा असावा. म्हणून अशी क्षमता,धमक ज्या उमेदवारात आहे जनतेने त्यानाच निवडून द्यावे असे प्रतिपादन प्रदिप थोरवे यांनी केले आहे.
stay connected