सुरेश धस यांच्या भाषणाचा विपर्यास करून वातावरण खराब करणार्‍यांची कीव येते - रेवण खाडे

 सुरेश धस यांच्या भाषणाचा विपर्यास करून वातावरण खराब करणार्‍यांची कीव येते - रेवण खाडे



आष्टी (प्रतिनिधी) आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघात सुरेश धस यांचा प्रचंड मताने विजय झाला.विजय झाल्यानंतर सुरेश धस यांनी विजयी सभेत केलेल्या भाषणाचा  काही संधीसाधू लोकांनी विपर्यास करून त्यांची राजकीय पोळी भाजण्याचा  केविलवाणा प्रयत्न असून त्यातून आ.पंकजाताई मुंडे  आणि आ.सुरेश धस यांच्यातील दरी आणखी कशी वाढेल यासाठी काही विघ्नसंतोषी लोक जे नेहमी समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.अशा लोकांनी विधानसभा निवडणुकीत झालेल्या काही अप्रिय घटना बाबत  सत्य परिस्थिती समजून घेतली पाहिजे असे मत सामाजिक कार्यकर्ते रेवणनाथ खाडे यांनी व्यक्त केले भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्व असलेल्या आमदार पंकजाताई मुंडे यांच्या समर्थकांनी विधानसभा निवडणुकीतील प्रचारांमध्ये अपक्ष उमेदवाराचे प्रचार करण्यास सांगितले आहे असा व्हिडिओ झाल्याने पाच टर्म आमदार राहिलेले नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांनी हा प्रकार धक्कादायक असल्याचे वक्तव्य केले होते याबाबत त्यांनी मनातील खंत व्यक्त केली याचा विपर्यास अपक्ष उमेदवाराचा प्रचार केलेल्या काही व्यक्तींनी गैरफायदा घेत  या दोन मोठ्या नेतृत्वामध्ये भांडणे लावण्याचा उद्योग केला आहे असे सांगून 

रेवणनाथ खाडे  पूढे म्हणाले की,

विजयी सभेत आ.सुरेश धस यांनी जे सांगितलं ते म्हणजे पंकजाताई मुंडे यांनी मला मदत केली नाही,मला पाडण्यासाठी प्रयत्न केले हे माझ्या मनाला लागलं असे ते म्हणाले.म्हणजे ताई तुमच्या  कट्टर म्हणवणाऱ्या आणि तुम्ही मतदार संघात आल्या की तुमच्या आजूबाजूला मोहोळा सारखे  चिकटणाऱ्या लोकांनी मी अडचणीत असताना मला मदत तर केली नाहीच शिवाय माझ्या विरोधात अपक्ष उमेदवाराचा जाहीर प्रचार केला.अशावेळी तुम्ही त्यांना सुनावलं पाहिजे होत मात्र तुम्ही देखील काही बोलला नाहीत.म्हणजे याला तुमचा दुजोरा असल्याचे दिसून आले असे ते म्हणाले.मात्र त्यांच्या भाषणातील मतितार्थ कोणीही लक्षात घेतला नाही.शिवाय याची शहानिशा करण्याचा प्रयत्न देखील कुणी केला नाही.उलट ही संधी साधत आ.पंकजाताई मुंडे आणि आ.सुरेश अण्णा धस यांच्यातील  दरी कशी वाढेल याचा जे लोक प्रयत्न करत आहेत त्या लोकांनी सुरेश अण्णांना मदत तर केली नाहीच उलटपक्षी अपक्ष उमेदवार यांच्या शिट्टीचा प्रचार करण्यासाठी गावोगाव बैठका घेऊन पंकजा ताईंचा निरोप आहे असे उघडपणे सांगत विरोध केला.अशावेळी भाजपचे उमेदवार असलेले सुरेश धस यांनी लोकसभेला पंकजाताईंना निवडून आणण्यासाठी दिवसरात्र एक केले.मराठा समाजाचा रोष पत्करत दारोदार फिरले.मराठा बहुल गावातून पंकजाताईंना मताधिक्य दिले.32 हजाराची लीड देण्याचे काम केले.अशावेळी सुरेश धस यांची प्रामाणिक इच्छा होती की मी अडचणीत असल्यावर मला प्रामाणिक मदत झाली पाहिजे.कारण भाजपचे ते उमेदवार होते,अशावेळी त्यांना अडचणीत आणण्यासाठी जर प्रयत्न झाला असेल तर त्यांनी त्यांच्या मनातील खंत बोलून दाखविने स्वाभाविक होते.मात्र याचा विपर्यास करून मतदार संघातील वातावरण खराब करण्यासाठी निवडून न आलेले विरोधक जर याचे भांडवल करत असतील तर त्याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते असे मत रेवणनाथ खाडे यांनी व्यक्त केले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.