युवा पिढीने संविधानाचा सखोल अभ्यास करावा : आ.सुरेश धस
आष्टी: प्रतिनिधी
सध्याची युवा पिढी ही सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.मोबाईल मुळे वाचन क्षमता हरपत चाललेली आहे. घराघरांमध्ये मोबाईलने थैमान घातल्यामुळे वाचनाकडे आई-वडिलांसह मुलाचेही दुर्लक्ष होत चालले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानात आहे हे वाचण्यासाठी आजची तरुणाई वेळ देत नाही. त्यासाठी तरुणांनी संविधानाचा सखोल अभ्यास करण्याचे आवाहन आमदार सुरेश धस यांनी केले. ते आष्टी येथे नगरपंचायत कार्यालयात संविधान दिन कार्यक्रमात बोलत होते यावेळी व्यासपीठावर मुख्याधिकारी सौ. पाटील मॅडम, नगराध्यक्ष जिया बेग, उपनगराध्यक्ष शैलेश सहस्रबुद्धे ,माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना धस म्हणाले की,भारताचे संविधान जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ मानले जाते. येथील बंधूता, समता आणि स्वातंत्र्य जगाच्या पाठीवर कुठेही पहायला मिळत नाही भारतीय संविधानाने येथील नागरिकांना खरे स्वातंत्र्य बहाल करून दैनंदिन जीवन जगण्याचा अधिकार दिला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर डॉ राजेंद्र प्रसाद आणि सर्व सदस्यांनी दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधी घेऊन सक्षम राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी तयार करून २६ जानेवारी १९४९ ला देशात ती अमलात आली. जगाच्या पाठीवर सक्षम लोकशाहीचा आपण स्विकार केला. दैनंदिन जीवनात कसे जगायचे हे अधिकार आपल्याला राज्यघटनेने दिलेले आहेत अनेक महापुरुषांनी अभ्यास करून तळागाळापर्यंत जाऊन सक्षम राज्यघटना निर्माण केली आहे
तळागाळातील लोकांना जगण्याचा अधिकार हा संविधानाने दिला असून यामुळे अनेक गोरगरीब व दिन दुबळ्या जनतेचा मोठा फायदा झाल्याचे धस यांनी सांगितले. यावेळी आष्टी शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले. उपनगराध्यक्ष व्यापारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय शेठ मेहेर अरुण भैय्या सरपंच अशोक मुळे, डॉ जालिदर वांढरे,सचिन लोखंडे, निकाळजे,सादीक कुरेशी,बाळुशेठ मेहेर दीपक निकाळजे, राजेंद्र जोशी, राहुल मुथा,नवनीत कासवा, बंबुशेठ आतार शममुभाई दारुवाले,समिर शेख,शरीफ शेख, मधुकर नवसुपे,पत्रकार उत्तम बोडखे,दत्ता काकडे,रघुनाथ कर्डीले, दुर्गेश कुलकर्णी, जोतिबा रेडेकर,अविशांत कुमकर,शरद रेडेकर,प्रविण पोकळे,शरद तळेकर,सचिन रानडे,गणेश दळवी, संतोष सानप,आधीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected