आपल्या प्रामाणिक आजबे काकांना निवडून द्या विकास कामासाठी पाच हजार कोटी निधी देतो ---- उपमुख्यमंत्री अजित पवार

 आपल्या प्रामाणिक आजबे काकांना निवडून द्या विकास कामासाठी पाच हजार कोटी निधी देतो
---- उपमुख्यमंत्री अजित पवार 

अफवांवर विश्वास ठेवू नका आ आजबे हेच माझे उमेदवार ----ना. धनंजय मुंडे




आष्टी प्रतिनिधी:

आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यासाठी आपण जेव्हा जेव्हा सत्तेत होतो तेव्हा तेव्हा मोठ्या प्रमाणात निधी देण्याचा प्रयत्न केला आहे परंतु या पाच वर्षात बाळासाहेब आजबे आमदार असताना आजपर्यंत ऐतिहासिक सर्वात जास्त अडीच हजार कोटी रुपये निधी आपण आजबे काकांच्या म्हणण्यानुसार दिला आहे समोर उभा असलेल्या विरोधी पक्षातील उमेदवारांचा इतिहास सांगण्यासारखा नाही तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे निष्कलंक व प्रामाणिक आमदार आजबे काकांना 20 तारखेला  मतदान करून पुन्हा एकदा प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे भावनिक आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडा येथे सभेत बोलताना केले. तर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील आ. बाळासाहेब आजबे हेच माझे उमेदवार आहेत बाकी कोणालाही थारा देऊ नका असे आवाहनही यावेळी बोलताना कृषी मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

       आष्टी तालुक्यातील कडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची जाहीर सभा सकाळी दहा वाजता संपन्न झाली यावेळी पुढे बोलताना अजित दादा म्हणाले की राज्यामध्ये महायुतीचे सरकार आहे मोठ्या प्रमाणात विकास कामे व वेगवेगळ्या वैयक्तिक लाभाच्या योजना या सरकारने सुरू केल्या आहेत व त्या सुरळीत चालू आहेत त्यामुळे येणारे सरकार हे महायुतीचे सरकार असणार आहे आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातून विकासाभिमुख नेतृत्व तुमच्या बरोबर व माझ्याबरोबर ही प्रामाणिक काम करणारे आ. बाळासाहेब आजबे यांच्या कामाची पावती म्हणून येणाऱ्या पाच वर्षासाठी पुन्हा एकदा विकास कामे करण्यासाठी त्यांना विधानसभेत प्रचंड बहुमताने विजयी करून पाठवावे मी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे तुम्हाला कसलीही कमतरता भासू देणार नाही असा शब्द देतो शेती पाणी वीज रस्ते अशा जनतेच्या हिताची कामे करणारा आमदार म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्या विरोधात असलेले उमेदवार हे काय करत आहेत हे सर्वांना माहिती आहे त्यांचा इतिहास या ठिकाणी न सांगितलेला बरा एवढा वाईट इतिहास त्यांचा आहे त्यांच्या तुलनेत आमदार बाळासाहेब आजबे काकांचा इतिहास हा चांगला असून निष्कलंक व विकासभिमुख नेतृत्व म्हणून ते उदयास आले आहे मतदारसंघात आपण सत्तेत आल्यानंतर चार टीएमसी पाण्याचा प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देणार आहोत गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये या मतदारसंघासाठी आपण अडीच हजार कोटी रुपयांचा विकास निधी दिला येणाऱ्या पाच वर्षात हाच विकास निधी दुपटीने वाढवून 5000 कोटी रुपये एवढा प्रचंड विकास निधी आष्टी मतदार संघाला देऊ असे आश्वासन यावेळी बोलताना अजितदादा पवार यांनी दिले  या सभेसाठी धनंजय मुंडे येणार होते परंतु ऐनवेळी हेलिकॉप्टरचा बिघाड झाल्यामुळे त्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधत आपले भाषण केले यावेळी बोलताना ते म्हणाले की आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघासाठी आमदार बाळासाहेब आजबे काका व मी आम्ही दोघांनी मिळून मोठ्या प्रमाणात विकास कामासाठी निधी आणला आहे आमदार बाळासाहेब आजबे काका हे मतदारसंघाला गरज असलेले आमदार आहेत येणाऱ्या काळात ते मतदारसंघाचा विकास करून मतदारसंघाला पुढे नेतील सर्वसामान्य जनतेची तळमळ असणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे कुठल्याही भूलथापांना अफवांना व मेसेजला बळी न पडता येणाऱ्या 20 तारखेला आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या घड्याळाचे बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले विरोधी पक्षाकडून वेगवेगळे मेसेज व अफवा पसरल्या जात आहेत ह्या अफवा सपशेल खोट्या असून आमदार बाळासाहेब आजबे काका हेच आमचे व महायुतीचे उमेदवार असून त्यांनाच प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन शेवटी धनंजय मुंडे यांनी बोलताना केले यावेळी आमदार बाळासाहेब आजबे यांनी बोलताना सांगितले की आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील जनता ही सुज्ञ आहे गेल्या लोकसभेला धनु भाऊ च्या खांद्याला खांदा लावून आम्ही पंकजाताईचे काम केले परंतु त्यात त्यांचा पराभव झाला तो त्या पराभवासाठी आपल्या मतदारसंघातीलच भाजपचे उमेदवार कारणीभूत आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत त्यांना थारा देऊ नका आजपर्यंत त्यांनी अनेकांना फसवले आहे ते जनतेलाही फसवत आहेत त्यामुळे अशा फसव्या उमेदवारापासून लोकांनी सावध राहिले पाहिजे सर्व जाती धर्म तील जनतेचा आपल्याला पाठिंबा असून दररोज शेकडो युवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे आपला विजय निश्चित असून येणारे दोन दिवस सर्वांनी डोळ्यात तेल घालून मतदान करून घ्यावे विरोधक अफवा सोडत आहेत कुठलीही अफवा अगर मेसेज यावर विश्वास न ठेवता आपण आपले काम प्रामाणिकपणे पार पाडायचे आहे आष्टी तालुका चर्मकार संघाने ही यावेळी आपल्याला पाठिंबा दर्शवला आहे त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो आपला विजय निश्चित आहे कोणाचीही दडपशाही खपून घेतली जाणार नाही माझ्या कार्यकर्त्याच्या केसालाही धक्का लागला तर माझ्याशी गाठ आहे असा सज्जड दमही यावेळी बोलताना आमदार आजबे यांनी विरोधकांना दिला आहे ही निवडणूक आहे ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडू द्या तुम्ही तुमचे विकासकामे सांगा मी माझे विकासकामे सांगतो त्यामुळे उगाच गालबोट लागेल असे  कोणीही करू नका असे आवाहनही आमदार बाळासाहेब आजबे यांनी केले शेवटी दशरथ दादा वनवे धैर्यशील थोरवे नवनाथ ढाकणे सर भाऊसाहेब लटपटे यांची भाषणे झाली या सभेसाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता सकाळी दहा वाजता सभा असतानाही आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातून मोठ्या संख्येने महिला पुरुष व युवक युवती उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.