महाराष्ट्राची पहिली लाडकी मुख्यमंत्री पंकजाताई यांना जनतेची पसंती..!- कु.अश्विनी सुदर्शन घुले
--------------------------
आष्टी ( प्रतिनिधी) आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करण्यात येते की हा मेसेज आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब व गृहमंत्री अमित जी शहा साहेब यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजेत आणि त्यांनी ताईच्या कामाची विचारपूस करून ताईंना मुख्यमंत्री केलंच पाहिजे.ताईंनी विधानसभेसाठी स्टार प्रचारक म्हणून विडा उचलला आणि तो पूर्ण केला.जास्तीत जास्त सभा घेऊन आमदार निवडून आणले ताईंनी जीवाचे रान केले.हात फॅक्चर असताना देखील त्यांनी दिवस-रात्र करून जेवण देखील हेलिकॉप्टर मध्येच केले.विरोधकांच्या शिव्या खाल्ल्या,पण भारतीय जनता पार्टीने दिलेली जबाबदारी ताईने पूर्णपणे पार पाडून,अपक्ष आमदार धरून 237 आमदार सरकारला दिले आणि त्यावर वरील महोदय म्हणतात की मला मुख्यमंत्री करा! खरं बघितलं तर माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी मुंबई सोडली नाही.माननीय फडणवीस साहेब यांनी नागपूर सोडले नाही.माननीय अजितदादांनी बारामती सोडली नाही.कारण यांना सर्वांना पडण्याची भीती होती.त्यामुळे यांनी कुठेच सभा घेतल्या नाही.या विधानसभेत सहभाग घेतला तो फक्त आणि फक्त माननीय पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांनीच पैकी पैकी आमदार निवडून आणले,आणि परत तेच सांगतात की आम्ही लाडक्या बहिणीचा आम्हाला फायदा झाला लाडक्या बहिणींनी आम्हाला पूर्णपणे पाठिंबा दिला मग मला या ठिकाणी आवर्जून सांगायची की लाडकी बहीण माननीय पंकजाताई मुंडे या नाहीत का? ताई तर तुमची बहीणच आहे ना! मग तुम्ही सर्वजण मिळून ताईंना मुख्यमंत्री होण्यासाठी विरोध का करता !तुम्ही असे का बोलत नाही की ताईंना मुख्यमंत्री करा आम्ही सर्वजण समर्थन देतो.होऊन जाऊ द्या,आपल्या महाराष्ट्राची पहिली महिला लाडकी बहीण मुख्यमंत्री माननीय पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांना जनतेची पसंती..! असे अश्विनी सुदर्शन घुले यांनी जनहितार्थ प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे
stay connected