फक्त निवडणूकीत तुम्हाला जात आठवते शिक्षक भरती करताना किती माळी, वंजारी, मराठ्यांना नोकरी दिली ?
अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांना माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे यांचा सवाल
आष्टी (प्रतिनिधी) -- 1978 पासून एक वेळचा अपवाद वगळता दर विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या भीमराव धोंडे यांनी भाजपाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंडखोरी केली असून भीमराव धोंडे यांना फक्त निवडणूक आली की जातीची आठवण येते त्यांच्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये मराठा, वंजारी धनगर आणि इतर ओबीसी समाजाचे किती प्रमाण आहे या समाजातील किती जणांना आपण नोकऱ्या दिल्या आहेत असा सवाल आष्टी पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे यांनी केला आहे
आष्टी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक चांगली तापली असून आष्टी विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार सुरेश रामचंद्र धस आणि महायुतीतील असणारे परंतु बंडखोरी करणारे माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यामध्ये लढत होत असून
भीमराव धोंडे हे या निवडणुकीला जातीवादी रंग देत असून आपण ओबीसी असल्याने ओबीसींनी एकूण माझ्या पाठीशी राहावे असे ते आपल्या प्रचार दौऱ्यात प्रत्येक गावात जाहीर रित्या बोलत आहेत
भीमराव धोंडे हे स्वतःला शिक्षण महर्षी म्हणवतात,मात्र शिक्षण संस्थेमध्ये ज्यावेळी शिक्षकांच्या जागा भरल्या जातात त्यावेळी मतदारसंघातील किती माळी, वंजारी, धनगरांसह इतर ओबीसी समाजाला आपण किती न्याय दिला आहे?
याचे आत्मपरीक्षण करावे असे आव्हान रंगनाथ धोंडे यांनी दिले आहे
आपण आपल्या संस्थेमध्ये बाहेच्या नगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोक शिक्षक सेवेत भरले आहेत . यावरून आपण मतदारसंघांमध्ये कशा पद्धतीचा जातीवाद करतात हे जनतेला दिसून आले आहे त्यामुळे उद्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण करत असलेल्या ओबीसी विरुद्ध मराठा या जातीवादी प्रचाराला जनता बळी पडणार नसून आपला खरा पिक्चर जनतेसमोर येणार आहे आपण स्वतःला शिक्षण महर्षी समजतात शिक्षण संस्थेच्या माध्यमातून किती गरिबांना तुम्ही नोकरी दिल्या आहेत आष्टी तालुक्यातील विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या समजल्या जाणाऱ्या कडा कारखान्याचा संपूर्ण सत्यनाश केला आणि कामगारांचे संसार उध्वस्त केले आहेत अशा नेतृत्वाला जर जनतेने संधी दिली तर जनतेवर पश्चातापाची वेळ येणार आहे . तरी या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार धस सुरेश रामचंद्र धस या खंबीर नेतृत्वाच्या पाठीशी उभा राहून आपल्या मतदारसंघाचा सार्वजनिक विकास करण्यासाठी सुरेश धस यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे यांनी केले आहे.
stay connected