मतदारसंघात संघाचा विकास करायचा असेल तर माझ्या शिट्टी या चिन्हाला मतदान करावे - भिमराव धोंडे

 मतदारसंघात संघाचा विकास करायचा असेल तर माझ्या शिट्टी या चिन्हाला मतदान  करावे - भिमराव धोंडे





आष्टी प्रतिनिधी

 माझ्या शब्दावर विश्वास ठेवून मला मतदान करा मी तुमचे अनमोल मत वाया जाऊ देणार नाही असा सार्थ विश्वास माजी आमदार व अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांनी आष्टी तालुक्यातील बीड सांगवी येथील मतदारांना दिला.

      प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने शुक्रवारी सकाळी अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांनी बीड सांगवी येथे भेट दिली याप्रसंगी बीड सांगवीकरांनी तोफा वाजून व वाजत स्वागत केले होते. छोटेखानी कॉर्नर बैठकीस माजी सभापती साहेबराव मस्के, माजी शिक्षण सभापती, घनश्याम नरवडे, नवनाथ जाधव, शिवाजी करांडे, अज्जुभाई, मच्छिंद्र करांडे, बाबासाहेब पानतावणे, महादेव करांडे,प्रभाकर काकडे, बागल मामा,  महादेव नरवडे, अर्जुन नरवडे, हरि करांडे व इतर उपस्थित होते. 

यावेळी बीड सांगवी येथील ग्रामपंचायत सदस्य लहु करडूळे तसेच बाळासाहेब गणगे, आबासाहेब लबडे, उत्तम जाधव यांनी माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या गटात प्रवेश केला.

         पुढे बोलताना माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की, मी मतदारसंघात भरपूर विकास केला आहे.  अनेक रस्ते तसेच शैक्षणिक कामे केली आहेत. मी कधीच कोणत्याही कामात  कमिशन घेतले नाही. आपल्या मतदारसंघात चौरंगी लढत आहे. विश्वास ठेऊन मतदान करा तुमचे मत वाया जाऊ देणार नाही. कोणालाही व्यसनी बनवणार नाही ‌ मतदानासाठी काही लोक गोरगरिब युवकांना भूरळ चालतात. परंतु मतदारसंघात संघाचा विकास करायचा असेल तर माझ्या शिट्टी या चिन्हांला मतदान  करावे असेही त्यांनी सांगितले. 

माजी सभापती साहेबराव म्हस्के यांनी सांगितले की,  मागील निवडणुकीत जवळच्या लोकांनी धोका दिल्याने माजी आमदार भीमराव धोंडे यांचा पराभव केला. 1980 पासुन भीमराव धोंडे विकास कामे करतात. त्यांच्या काळातील सर्व कामे दर्जेदार झालेली आहेत. अलीकडील काळात बोगस कामे जास्त केली जातात. भारतीय जनता पक्षाकडून शेतकरी मालाला भाव मिळत नाही त्यामुळे भाज्यांवर शेतकरी नाराज आहेत.‌ भीमराव धोंडे हेहा कामाचा आणि प्रामाणिक माणूस आहे त्यामुळे मतदारांनी शिट्टी चिन्हाला मतदान करावे. 



  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.