चाकुने मारहाण केल्याप्रकरणी भा.दं.वि. कलम ३०७ मधील आरोपीस जामीन मंजुर.
अहमदनगर - कोतवाली पोलीस स्टेशन येथे भा.द.वि. कलम ३०७, ५०४, ५०६, शस्त्र अधिनियम ४, २५ व फौजदारी कायदा अधिनियम चे कलम ७ या कलमान्वये दाखल गुन्हयातील आरोपीस अहमदनगर येथील मा. सत्र न्यायाधिश साहेब, यांचे कोर्टाने जामीन मंजुर केला आहे.
सदर प्रकरणाची थोडक्यात हकीगत -
फिर्यादीचे वडील हे दि.०८/०५/२०२४ रोजी दुपारी ४:२५ वा. जुने जिल्हा न्यायालय अहमदनगर येथे कामानिमित्त आले असता. आरोपी अनिल लक्ष्मण गायकवाड, रा. अहमदनगर यांनी फिर्यादीचे वडील यांना चाकुने जबर मारहाण करुन गंभीर केल्याबाबत कोतवाली पोलीस स्टेशन येथे भा.द.वि. कलम ३०७, ५०४, ५०६ शस्त्र अधिनियम ४, २५ व फौजदारी कायदा अधिनियम चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदरच्या गुन्हयामध्ये पोलीस तपासात आरोपी अनिल लक्ष्मण गायकवाड यास दि.०९/०५/२०२४ रोजी अटक झाली होती.
दरम्यान आरोपी अनिल लक्ष्मण गायकवाड याने जामीन मिळण्याकरीता अहमदनगर येथील मा.सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केला. सदर जामीन अर्जाची नुकतीच सुनावणी झाली. आरोपीच्या वकीलांनी सदरचा जुन्या वादातुन आरोपीला खोटया गुन्हयात अडकविले असल्याचा युक्तीवाद केला. आरोपीचे वकील व सरकारी वकील यांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मा. सत्र न्यायालयाने आरोपीस अटी व शर्तीवर जामीन मंजुर केला.
आरोपीच्या वतीने अॅड. देवा थोरवे व अॅड. सागर दिलीप कुऱ्हाडे यांनी युक्तीवाद केला.
stay connected