भीमराव धोंडे यांचा विजय निश्चित, धास्तावलेल्या विरोधकांचा धोंडे यांना बदनाम करण्याचा रडीचा डाव
आष्टी प्रतिनिधि
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघामध्ये चौरंगी लढतीचे चित्र असून त्यामध्ये अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांचा विजय निश्चित झाल्यामुळे धास्तावलेल्या विरोधकांनी सरळ स्वभावाच्या माजी आमदार भीमराव धोंडे यांना बदनाम करण्याचा अखेरचा रडीचा डाव टाकल्याची जोरदार चर्चा मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे माजी आमदार धोंडे यांना आणखी सहानुभूती वाढण्याचे चित्र दिसत आहे.
आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे मेहबूब शेख हे उमेदवार आहेत तसेच महायुतीकडून एक उमेदवार असणे अपेक्षित होते त्यातही नैसर्गिक रित्या ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाटेला जाईल असे वाटत होते आणि महायुतीचे उमेदवार आमदार बाळासाहेब आजबे असतील असे गृहीत होते परंतु भाजपने ही या जागेवर माजी आ. सुरेश धस यांना उमेदवारी दिली आणि दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसनेही आ. बाळासाहेब आजबे यांना अधिकृत उमेदवारी दिली त्यामुळे या मतदारसंघांमध्ये घड्याळ आणि कमळ या दोन्ही चिन्हांवर निवडणूक लढवली जात आहे.
या मतदारसंघांमध्ये सन 2019 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप कडून माजी आमदार भीमराव धोंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून बाळासाहेब आजबे यांनी निवडणूक लढवली होती यामध्ये माजी आमदार धोंडे यांना सुमारे एक लाख सहा हजार मते मिळाली होती तरी ते आजबे यांच्याकडून पराभूत झाले होते या निवडणुकीनंतर भाजपाच्या कार्यकारिणीने महाराष्ट्रात एक लाखापेक्षा जास्त मतदान घेऊन पराभूत झालेल्या सर्व उमेदवारांना पुढील निवडणुकीत उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते त्यामुळे मा. आ. धोंडे यांनी पाच वर्षे जनसंपर्क वाढवला आणि विधानसभा मतदारसंघाची बांधणी केली त्यामुळे त्यांची मतदारसंघावरील पकड घट्ट झाली आणि या निवडणुकीमध्ये भाजपने त्यांना उमेदवारी नाकारून देवेंद्र फडणवीस यांच्या हट्टामुळे माजी आ.सुरेश धस यांना उमेदवारी दिली. पाच वर्षे मतदारसंघांमध्ये सक्रिय राहिलेल्या माजी आ.भिमराव धोंडे यांनी अखेर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला सध्या परिस्थितीमध्ये समाजातील सर्व घटकां सोबत नाळ जोडलेल्या मा. आ.भीमराव धोंडे यांचा विजय निश्चित मानला जात असल्याने आणि समोरासमोर त्यांच्याशी लढत अशक्य दिसत असल्याने हताश झालेल्या आणि धास्तावलेल्या विरोधकांनी त्यांना बदनाम करण्याचा रडीचा डाव खेळल्याचे दिसत आहे. त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रकार काही ठिकाणी करण्याचा सुरू आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच नेहमी त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असतो असे प्रकार यापूर्वी देखील झालेले आहेत परंतु त्यामध्ये नंतर काहीही तथ्य नसल्याचे निष्पन्न झाले आहे.
निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांमध्ये सर्वात सरळ स्वभावाचे उमेदवार म्हणून मा. आ. धोंडे यांची ओळख आहे कदाचित त्यामुळेच त्यांना अशा प्रकारे टार्गेट केले जात असल्याने त्याचा परिणाम उलटा होऊन त्यांच्याबद्दल सहानुभूतीचे वातावरण निर्माण झाले आहे परंतु मतदार संघात प्रचाराचा स्तर मात्र खालावल्याची चर्चा मतदारसंघांमध्ये दिसून येत आहे.
stay connected