एम आय डी सी, आणि सहकारी साखर कारखाना निर्मितीसाठी , विकासाची दृष्टी,असलेले मा. महेबुब भाई यांना आमदार करा--प्रा.दादासहेब झांजे
आष्टी, पाटोदा,शिरूर विधान सभा मतदार संघामध्ये आज जी विधान सभेची निवडणूक होत आहे ही निवडणूक मागील निवडणुकीपेक्षा आगळी वेगळी आहे कारण या निवडणुकीमध्ये प्रथमच विकासावर निवडणूक होत आहे आतापर्यंत विकासाचे मुद्दे निवडणुकीमध्ये आले नव्हते प्रथमच मा.महेबुब शेख यांनी ही निवडणूक जनतेचा जीवनात आर्थिक क्रांती घडली पाहिजे, मतदार संघातील तरुण जो बेरोजगार आहे तो तरुण आज मुबई,पुणे यासारख्या मोठ्या महानगरामध्ये आज घरदार, गाव तालुका सोडून फक्त रोजीरोटी शोधण्यासाठी जात आहेत त्यातून बाहेर जाणं कुटुंबासाठी हे त्रासदायेक आहे हे जर बंद कऱ्याचे असेल तर आपल्या जवळ रोजगार आपल्या मतदार संघात उपलब्ध करून देण्याची हमी मा.महेबुब भाई यांनी मा. शरदचंद्र पवार साहेब यांचा सभेमध्ये पवार साहेब आणि महेबुब भाई यांनी हमी दिली आहे असे विचार प्रा. दादासाहेब झांजे यांनी संवाद यात्रेस मार्गदर्शन करीत असताना व्यक्त केले, आपल्या मतदार संघात शेतकरी आज ऊस सहकारी साखर कारखान्यासाठी जात नाही त्यामुळे फार मोठ्या अडचणीत आहे ऊस उशिरा जातो,नवीन लागवड होत नाही एक सहकारी साखर कारखाना होता तो बंद आहे त्यामुळे ही शेतकऱ्याची गरज ओळखून मागणी ऐकून कारखाना उभा करण्याचा संकल्प केला व तशी घोसणा पवार साहेब समोर केली आणि पवार साहेबांनी त्यांची मागणी मान्य केली असे विकासाकडे घेऊन जाणारे नेतृत्व हे मा. महेबुब भाई याचाकडे आहे हे जनतेने ओळखले आहे, आज आपला मतदार संघ अनेक प्रश्नाने ग्रासला आहे,ही जनता उघड्या डोळ्याने पहात आहे आणि त्यामुळे आज जनता पवार साहेबांच्या पाठीमागे उभी राहिली आहे, मा. महेबुब भाई यांचे नेतृत्व विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व आहे,तरुण उमेदवार असलेले नेतृत्व आहे,अनेक प्रश्नांची अचूक जाणं असलेले नेतृत्व आहे निरागस सोज्वळ नेतृत्व आपल्याला उमेदवार म्हणून लाभले आहे त्यामुळे मतदार संघातील जनतेने या विकासाला साथ देणाऱ्या उमेदवाराला मा. महेबुब भाई शेख यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या अशी विनंती प्रा दादासाहेब झांजे यांनी केली .
stay connected