[ अंमळनेर व डोंगरकिन्हीच्या कॉर्नर सभेने विरोधकांना मोठा हादरा! ]
*ग्राउंड लेव्हलच्या प्रचारात आजबे यांची मुसंडी ; जनतेतून आजबेंचा विजय निश्चित!*
★एकही मोठी सभा नसताना जनतेत आमदार आजबेंचा बोलबाला!
आष्टी प्रतिनिधी :
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघात विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांच्या कॉर्नर सभेच्या धुमधडाक्याने विरोधकांच्या बालेकिल्ल्यात चांगलाच सुरंग लागल्याचे दिसत आहे. पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही अंमळनेर येथील झालेल्या कॉर्नर सभा ह्या विरोधकांना हादरा देणारे आहे. जनतेचा मिळणारा उदंड प्रतिसाद हा विजयाकडे घेऊन जाणार आहे आणि जनतेने ही निवडणूक हाती घेतली हे हात संदेश देणार आहे.
अंमळनेर व डोंगरकिन्हीच्या आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या कॉर्नर सभेने विरोधकांना चांगलाच हादरा दिला असून जनतेने ही निवडणूक हाती घेतल्याचे चित्र दिसत आहे. सर्वसामान्य जनतेचा मिळणारा प्रतिसाद हा विजयाकडे वाटचाल करणारा दिसत आहे. आजबे काकांवर अठरापगड जाती धर्मातील प्रेम करणारा वर्ग आजबे काकांसाठी एक झाला आहे. काकांचा विजय हेच आमचे लक्ष समजून कामाला लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एकही मोठी सभा नसताना आजबे काकांना ही निवडणूक अगदी सोपी चालली आहे कारण की ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे. सर्वसामान्य जनतेचा मिळणारा प्रतिसाद हेच काकांचे भांडवल आणि हेच विजयाचे शुभ संकेत मानले जात आहेत.
★एबी फॉर्म सारखा काका धमाका करणार का ?
सर्वसामान्य जनतेचा मिळणारा आजबे काकांना प्रतिसाद आणि काकांनी आजपर्यंत एकही मोठी सभा न घेतल्याने अनेक जण तर्क वितर्क लावत आहेत एबी फॉर्म सारखा आजबे काका काहीतरी वेगळा धमाका करणार का ? अशा सुद्धा चर्चा सुरू आहे.
★लहानापासून थोडापर्यंत फक्त आजबे काकाच!
कुसळंब येथील विक्रम पवार यांचे चिरंजीव ऋषिकेश विक्रम पवार यांनी आमदार बाळासाहेब आजबे काका बद्दल केलेल्या भावना व्यक्त खरंच आपुलकीच्या आणि मनातल्या होत्या त्या ऐकत्या क्षणी काकांनी त्या चिमुकल्याला जवळ घेऊन आपुलकीचा हात फिरवला आणि ह्या चिमुकल्यांच्या भविष्यासाठी मी आमदारकी लढवत आहे असं देखील यावेळी भावना व्यक्त केला.
★एकही मोठी सभा नसताना जनतेचा पाठिंबा काकांनाच!
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब आजबे काका यांची आजपर्यंत आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघात एकही मोठी सभा नसताना कॉर्नर सभेतून मिळणारा प्रतिसाद हा विजयाकडे घेऊन जाणार आहे. एकूणच ही निवडणूक जनतेनेच हाती घेतलेच चित्र दिसत आहे. सभा असो किंवा नसो जनता आजबे काकांनाच आमदार करणार असा निर्धार देखील केल्याचे दिसत आहे.
stay connected