आ.सुरेश धस यांनी कडा वीज उपकेंद्रातील ट्रान्सफार्मरचा प्रश्न मार्गी लावला शेतकऱ्यांनी मागणी करताच साताऱ्याहून ट्रान्सफॉर्मर मागविला

 आ.सुरेश धस यांनी  कडा वीज उपकेंद्रातील ट्रान्सफार्मरचा प्रश्न मार्गी लावला
शेतकऱ्यांनी मागणी करताच  साताऱ्याहून ट्रान्सफॉर्मर मागविला




आष्टी (प्रतिनिधी)  

 कडा येथील महावितरणच्या 33 केव्ही वीज  उपकेंद्रातील 05 मेगा व्होल्ट अॅम्पियर क्षमतेचे जनित्र (ट्रान्सफॉर्मर) दि.५ सप्टेंबर रोजी जळाल्याने कडा परिसरातील आठ ते दहा गावांचा विद्युत पुरवठा विस्कळीत झाला होता.     

 दोन दिवसांपूर्वी या परिसरातील शेतकऱ्यांनी मागणी केली असता याबाबीची तत्परतेने दखल घेत आ. सुरेश धस यांनी लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांना दूरध्वनी वरून संपर्क करत तात्काळ ट्रान्सफार्मर देण्याची मागणी करताच सातारा येथे उपलब्ध असलेला ट्रान्सफॉर्मर मागविला असल्याने अनेक गावांचा ऐन रब्बी हंगामातील विजेचा प्रश्न मार्गी लागला आहे.

       कडा गावासह परिसरातील केरूळ, देवीनिमगाव,डोंगरगण,शेरी खुर्द,शेरी बु||, मोरेवाडी,शेलारवाडीटाकळी अमिया इत्यादी गावातील वीज पुरवठा ट्रान्सफर्मर जळाल्याने विस्कळीत झाला होता.त्यामुळे  सोय म्हणून टाकळी (अमिया) आणि कडा कारखाना या उपकेंद्रातून तात्पुरत्या स्वरूपात वीज जोडणी केली होती. मात्र त्यामुळे दाब वाढला जाऊन वीज पुरवठा विस्कळीत होत होता. या कारणाने या भागातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा देखील इशारा दिला होता.यावर नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांनी निवडणुकीचा निकाल लागतात मुख्य अभियंता यांच्याशी संपर्क करत छ.संभाजीनगर व लातूर येथे उपलब्ध नसल्याने तात्काळ तो सातारा येथून नवीन आणण्यासाठी पाठपुरावा करून मागविला असल्याने आज किंवा उद्या अखेर तो कडा वीज उपकेंद्रात ट्रांसफार्मर दाखल होणार असल्याने वीजपुरवठा सुरळीत सुरू होणार आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील ज्वारी, गहू,मका, हरभरा, कांदा यासह अनेक पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची आता धांदल उडणार नाही. कडा वीज उपकेंद्रात नवीन ट्रान्सफॉर्मर दाखल होताच शेतकऱ्यांनी दबंग आमदार सुरेश धस यांचे आभार मानले आहेत


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.