राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आ. बाळासाहेब आजबे यांची प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात जोरदार मुसंडी
कॉर्नर बैठका आणि प्रचार रॅलीला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद
मतदार संघात आ. बाळासाहेब आजबे यांनी केलेले विकास कामे ठरत आहेत प्रभावी
आष्टी, दि . 14 ( तेजवार्ता न्यूज ) आष्टी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आ. बाळासाहेब आजबे यांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मतदार संघात जोरदार मुसंडी मारली असून त्यांच्या कॉर्नर सभा आणि प्रचार रॅलींना मतदारांची प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. आ. बाळासाहेब आजबे यांनी मतदारसंघात केलेली विकास कामे या निवडणुकीत प्रभावी ठरत आहेत. कॉर्नर सभेमधून विरोधकांवर तुफान टोलेबाजी करत आमदार आजबे हे प्रभावी ठरत आहेत.
आष्टी विधानसभा मतदारसंघ हा या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात महायुतीची उमेदवारी कोणाला मिळेल याची उत्सुकता असतानाच भाजपकडून माजी राज्यमंत्री सुरेश धस यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीत निवडणूक रंगणार असल्याचे दिसत असतानाच महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने देखील विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली. त्याचबरोबर महायुतीचे बंडखोर असलेले माजी आ. भीमराव धोंडे हे देखील अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर महाविकास आघाडी करून नवीन चेहरा असलेले महेबूब शेख यांना उमेदवारी दिली. त्यामुळे या निवडणुकीत प्रचंड सुरस निर्माण झाले आहे. सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्याकडे वळलेली आहे. या अंतिम टप्प्यात विद्यमान आ. बाळासाहेब आजबे यांनी मतदारसंघात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. आमदार बाळासाहेब आजबे हे कॉर्नर सभांमध्ये विरोधकांनी कशाप्रकारे मतदार संघाचे वाटोळे केले व विकास कामांना घातला घोडा हे सत्य मतदारांसमोर ठेवत असल्यामुळे मतदारातून आमदार आज यांच्या भाषणाला पसंती मिळत आहे त्यांच्या होत असलेल्या कॉर्नर सभा आणि प्रचार रॅलीला मतदार संघातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
विकासाच्या मुद्द्यावर आ.आजबे यांची प्रचारात मुसंडी
आ. बाळासाहेब आजबे यांनी गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकास कामे केलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाचा आणि आष्टी तालुक्याच्या जिव्हाळ्याचा असलेला पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. शिंपोरा येथून उजनीचे पाणी पाईपलाईन द्वारे थेट खुंटेफळ साठवण तलावात आणण्यासाठी प्रयत्न केले. या प्रयत्नाला यश आले असून शिंपोरा येथून पाईपलाईनचे काम देखील सुरू झाले आहे. त्याचबरोबर मतदार संघात मोठ्या प्रमाणावर बंधाऱ्याची उभारणी करून सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. शेतीला आवश्यक असलेले पाणी आणि वीज शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी केलेले प्रयत्न या निवडणुकीत प्रभावी ठरत आहे. त्याचबरोबर मतदार संघात शासकीय इमारती, आष्टी येथे उपजिल्हा रुग्णालय, कृषी विभागाची कार्यालयीन इमारत, रस्ते आदि विकास कामे प्रभावी ठरत आहे. त्यामुळेच आ. बाळासाहेब आजबे यांचे मतदारसंघात पारडे जड असल्याचे दिसत आहे.
stay connected