अपक्ष उमेदवार भिमराव धोंडेच्या प्रचारासाठी योगिता गवळीचा डोअर टू डोअर प्रचार

 अपक्ष उमेदवार भिमराव धोंडेच्या प्रचारासाठी  योगिता गवळीचा डोअर टू डोअर प्रचार 



आष्टी मतदार संघात शिट्टीचीच आवाज घुमतोय 


आष्टी ( प्रतिनीधी ):-


आष्टी विधानसभा मतदारसंघात शिक्षणमहर्षी, रस्तेमहर्षी विकासाभिमुख नेतृत्व मा.आ.भिमराव‌ धोंडे यांच्या प्रचारार्थ शिरुर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आजिनाथ गवळी यांची कन्या योगिता गवळी प्रचाराच्या माध्यमातून वाडी,वस्ती, डोअर टू डोअर, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मा.आ.भिमराव धोंडे नी मतदार संघात केलेल्या विकास कामाचा आढावा जनतेसमोर मांडून माजी आ. धोंडे यांना मतदान केल्याने काय विकास होणार समजावून २० तारखेला शिट्टीलाच मतदान करा एक वेळ लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी द्या अशी विनंती मायबाप जनतेला केली आहे.योगिता गवळीच्या प्रचाराने शिरुर तालुक्यात शिट्टीने प्रचारात चांगलीच उचल खाल्ली आहे.आष्टी विधानसभा मतदारसंघात मा.आ.भिमराव

धोंडे हे जनतेच्या आग्रहास्तव विधानसभा मतदारसंघात शिट्टी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत प्रचाराची रणधुमाळी सुरू असून अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांच्या गाव भेट दौऱ्याला 

घराघरात जाऊन प्रचार यंत्रणा राबवत आहे.प्रचाराच्या माध्यमातून वाडी,वस्ती, डोअर टू डोअर, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मा.आ.भिमराव धोंडेनी मतदार संघात केलेल्या रस्ते पाणी वीज प्राथमिक गरजांसह विद्यार्थ्यांच्या व पुढच्या पिढीच्या उज्वल भविष्यासाठी मतदारसंघात शिक्षणाची गंगा आणली व शिक्षण क्षेत्रातील क्रांती घडवून आणल्याने हजारो विद्यार्थी आज त्यांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहेत व  आमदारकीच्या काळामध्ये मतदार संघात न भूतो न भविष्यती असा मोठ्या प्रमाणावर विकास केला असून मतदारसंघाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला असून गोरगरीब सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या सुखदुःखात अहोरात्र धावून जाणारे नेतृत्व मा आ‌‌. धोंडे आहेत त्यांच्या शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना विधानसभेमध्ये पाठवून आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी भावनिक साद योगिता गवळी हिने मतदारांना घरोघरी वाडीवस्तीवरती जाऊन घातली आहे.ही निवडणूक जनतेने हातात घेतली असून धोंडे साहेब यांचा विजय निश्चित असल्याचे योगिता गवळी हिने म्हटले आहे.गाव भेट दौऱ्यात मतदारांशी ती संवाद साधत होती.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.