सुरेश धस यांच्या विजयासाठी संपूर्ण धस कुटुंब प्रचाराच्या मैदानात!
देवीदास धस,जयदत्त धस,राधेश्याम धस,सागर धस, यांनी पिंजून काढला मतदारसंघ
कड्यात प्राजक्ताताई धस यांच्या महिलाचा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी विधानसभा मतदारसंघातील राजकारणात अग्रणी असलेले आणि
गेली चाळीस वर्षांपासून स्व.रामचंद्र धस दादा आणि त्यानंतर सुरेश धस यांच्या माध्यमातून जनतेच्या सेवेत सत्ता असो किंवा नसो, कायम सक्रिय असलेल्या सुरेश धस यांच्या विजयाचा विडा बहाद्दर मतदारांनी उचलला आहे.
भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुरेश धस याच्या प्रचारार्थ संपूर्ण धस कुटुंब मतदारसंघातील जनतेच्या दारोदार जात आहे. भाऊ,पुतण्या,व दोन मुलांनी वाडी,वस्ती,तांड्यासह शहर व ग्रामीण भागातील गावे पिंजून काढली आहेत.
२३१ आष्टी,पाटोदा, शिरूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी,शिवसेना,रिपाई (आठवले गट) व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सुरेश रामचंद्र धस याचा अनुक्रम ३ असून कमळ चिन्ह आहे.या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतानी विजयी करण्याचा विडा मतदारांनी चलला असून ही निवडणूक मतदारांनी हाती घेतली आहे.अडीअडचणीत, सुखादुखात, मुख्यमंत्री साह्ययता मदत निधी,त्याच बरोबर वंचित घटकातील लोकांना आपलं मानून जीव लावणारे सुरेश धस याच्या नावाचा उल्लेख केला जातो.आजवर मतदारसंघात कधीच भेदभाव व जातीपातीच राजकारण न करता फक्त विकास काम कसे करता येईल हाच हेतू मनात ठेवून कामकाज केले आहे.आणि याच कामाच्या जोरावर ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत.बहाद्दर मतदारांनी ही निवडणूक हातात घेतली असून पूर्ण ताकदी निशी सुरेश धस याना विजयी करण्याचा विडा उचलला आहे.सुरेश धस पायाला भिंगरी बांधल्यागत मतदारसंघात फिरत असताना त्यांच्या दिमतीला भाऊ देवीदास धस,पुतण्या श्याम धस,मुलगा,जयदत्त धस,व सागर धस हे देखील मतदारसंघातील जनतेच्या दारोदार जाऊन मतदानरूपी आशिर्वाद मागत आहेत सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांनी देखील काही वर्षांपासून महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे मोठे संघटन उभे केले असून या महिला वर्गाने प्रचारात आघाडी घेतली कडा शहरात महिलांची प्रचार भव्य रॅली काढली होती. सुरेश धस प्रचंड मतानी विजयी होतील असे वातावरण आष्टी विधानसभा मतदारसंघांमध्ये आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील मतदारांमध्ये दिसून येत आहे
stay connected