सुरेश धस आमदार झाले अन् त्यांने चप्पल घातली सहा वर्षांपासून चप्पल न घालण्याचा निर्धार केलेल्या कार्यकार्त्याचे स्वप्न साकार

 सुरेश धस आमदार झाले अन् त्यांने चप्पल घातली
सहा वर्षांपासून चप्पल न घालण्याचा निर्धार केलेल्या कार्यकार्त्याचे स्वप्न साकार




आष्टी (प्रतिनिधी) 

वर्ष, दोन वर्ष नव्हे तर तब्बल सहा वर्ष चप्पल न घालता फिरणाऱ्या तरुणाने आपल्या नेत्यावर असलेले प्रेम व्यक्त करत चक्क सहा वर्षांनंतर त्याची इच्छा पूर्ण करत आमदार सुरेश धस यांनी स्वतःच्या हाताने माउलीला चप्पल घालून इच्छापूर्ती केल्याचे दिसून आले.आष्टी तालुक्यातील सावरगाव मायंबा येथील माऊली बांदल या तरूणाने सुरेश धस जेव्हा विधानसभा आमदार म्हणून निवडून येतील तेव्हाच पायात चप्पल घालीन नसता अनवाणी राहील असा निर्धार २०१८ पासून केला होता. वर्ष, सहा महिने नव्हे तर तब्बल सहा वर्ष तो तरुण अनवाणी फिरत होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुरेश धस निवडून आल्यानंतर स्वतः त्यांनी आपल्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्याला आष्टी येथील निवासस्थानी बोलावून नवीकोरी चप्पल घालून त्याने केलेला निर्धार पूर्ण केला.



कार्यकर्ता हीच माझी खरी उर्जा..!
आ.सुरेश धस


माझ्यावर प्रेम करणाऱ्या माऊली बांदल (रा.सावरगाव ता.आष्टी) या कार्यकर्त्याने २०१८ पासून मी निवडून येईपर्यंत चप्पल न घालण्याचा निर्धार केला होता. आष्टी-पाटोदा-शिरूर का. विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आशीर्वादाने मी निवडून आलो आणि माऊली यांचा चप्पल न घालण्याचा निर्धार स्वतःच्या हाताने त्यांना चप्पल घालून पूर्ण केला.

माऊली सारख्या माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बळावरच मी आत्तापर्यंत इथवर आलेलो आहे. इथून पुढे देखील याचं प्रेमाच्या शिदोरीवर माझी वाटचाल सुरू असल्याचे आ.सुरेश धस यांनी यावेळी सांगितले.



हीच माझी इच्छापूर्ती


सहा वर्षांपासून सुरेश धस किंवा कुटुंबातील कोणी आमदार झाले तरच मी पायात चप्पल घालेन हा निर्धार केला होता.विधानसभा निवडणुकीत सुरेश धस आमदार झाले. तेव्हाच हा निर्धार पूर्ण केला. याचा मला मनस्वी आनंद होत असून हीच माझी इच्छापूर्ती असल्याचे माऊली बांदल यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.