मुख्यमंत्री कुणीही झाले तरी आम्हाला आता लढावं लागेल- जरांगे
आमची जात आणि आमचे लेकरं बाळ मोठे करण्यासाठी आम्हाला लढावं लागणार आहे. कोण आल्याने आमच्या समाजाचे भलं होईल असं आम्ही कधीही अपेक्षित धरलं नाही. त्यामुळेच आम्ही उठाव आणि चळवळीवर विश्वास ठेवला आहे, त्यामुळे कोणी आलं काय आणि कोणी मुख्यमंत्री झाले काय आम्हाला लढावं लागणार आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
पहिल्यांदा तेच होते आणि आताही तेच आहे. त्याच्यामुळे आम्हाला संघर्ष करावाच लागणार आहे. आम्हाला लढावं लागलं असतं हे पहिल्या दिवसापासून मी सांगत आलो आहे. सत्ता, सत्ता असते. त्यावेळी मराठी नेत्यांना गुडघ्यावर टेकवले होते आणि आताही तेच सत्तेत आहेत. त्याचे आम्हाला काही वाटत नाही. सासु जरा खंदूशी असल्यासारखी आहे, आणि सासुला जनता बरोबर ठेप्यावर आणते, अशा शब्दात जरांगेंनी प्रतिक्रिया दिली
stay connected