आष्टीत रिपाईच्यावतीने परभणी येथील घटनेचा निषेधार्थ निदर्शने तहसीलदारांना निवेदन
***********************************
***********************************
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्यावतीने परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयासमोर असणा-या संविधानाच्या प्रतिमेला दगडाने फोडून विटंबना करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याच्या कृतीच्या निदर्शन करण्यात यावे हे मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
या निवेदनात असे म्हटले आहे की, परभणी येथे स्टेशन रोड भागातील जिल्हाधिकारी कार्यालया समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. तेथे संविधानाची सिमेंटपासुन बनवलेली प्रतिकृती असुन तिला काचेचे आवरण होते. एका माथेफिरूने दिनांक १०/१२/२०२४ रोजी सायंकाळी प्रतिकृतीची काच फोडली या कृत्यामुळे आपल्या भारत देशातील संविधानाचा अपमान झाला आहे. त्यामुळे संपुर्ण भारत देशातील संविधान प्रेमी यांच्या भावना दुखावल्या आहेत. या कृतीचा आष्टी तालुका रिपब्लीक पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या वतीने जाहिर निषेध करित असुन सबंधीत आरोपी विरूध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
या निवेदनावर रिपाईचे नेते जिल्हा उपाध्यक्ष अरूण (भैय्या) निकाळजे,शशिकांत निकाळजे,सादीक कुरेशी,बाजीराव वाल्हेकर,बब्बूभाई अत्तार,सामाजिक कार्यकर्ते अशोक निकाळजे,नितिन निकाळजे,सागर खंडागळे,सागर निकाळजे,बबलू निकाळजे,संदेश निकाळजे,हर्षवर्धन निकाळजे,सम्राट औसरमाल,गनिराव भालेकर,हौसराव भालेकर,मिलींद निकाळजे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
stay connected