राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत धोंडे कॉलेजच्या कु. सानिका गुंडने पटकावला द्वितीय क्रमांक
कडा ( वार्ताहर )-- येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी सानिका शिवाजी गुंड हिने विजेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे ज्ञानयज्ञ फाऊंडेशन आयोजित तृतीय पद्म फेस्टिवल २०२४ मध्ये राज्यस्तरीय निबंध स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन द्वितीय क्रमांक मिळवला. डॉ.कल्पना सरोज यांच्या जीवन कार्यावर अभ्यासपूर्ण निबंध लिहिला होता. या अगोदर शालेय जीवनात अनेक निबंध स्पर्धेत सहभाग घेऊन तीने पारितोषिके मिळवली आहेत.त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच.जी.विधाते यांच्या हस्ते विद्यार्थिनीचा सत्कार संपन्न करून अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी.एम.चव्हाण, उपप्राचार्य डॉ.एस.एन.वाघुले उपप्राचार्य डॉ. बी. एस. खैरे , प्रा.डाॅ.जी.पी.बोडखे, डॉ. एस. डी. गायकवाड, प्रा.एम.आर.पटेल , डॉ. डी. बी. जीरेकर, डॉ. डी. बी. बोराडे, डॉ. पी. एन. औटे उपस्थित होते.
stay connected