सात्रळच्या रयत शैक्षणिक संकुलात हिवाळी क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

 *सात्रळच्या रयत शैक्षणिक संकुलात हिवाळी क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न*





रयत शिक्षण संस्थेचे नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय सात्रळ ता.राहुरी जि.अ.नगर येथे नुकताच शालेय स्तरावर आयोजित केलेला हिवाळी क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला.

   याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आप्पासाहेब शिंदे शिक्षक नेते तथा मार्गदर्शक क्रीडा शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

    याप्रसंगी महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.

  कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आप्पासाहेब शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,तुम्ही देशाचे भविष्य आहात.त्यामुळे विद्यार्थ्यांनी मैदानावर भरपूर खेळून आपले आरोग्य निरोगी ठेवले पाहिजे असे प्रतिपादन शिंदे यांनी कार्यक्रमाच्या वेळी केले.

     यावेळी विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य राजेंद्र बडे, राष्ट्रीय खेळाडू कृष्णा कदम,पर्यवेक्षिका सुशिला थोरात आदि मान्यवर उपस्थित होते.

     या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र बडे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख विलास गभाले सहाय्यक ज्ञानदेव लेंडे, क्रीडा शिक्षक पुरब सुर्यवंशी,जेष्ठ शिक्षक त्रिंबक राशीनकर ,संगिता सांगळे,सतिश नालकर, प्रकाश कुलथे,संजू दिघे, युनूस पठाण, केशव मुसमाडे,प्रा.विलास दिघे,प्रा.पंकज दिघे,सतिश कदम, आण्णासाहेब गोर्डे, विश्वास घुगे,देविदास थोरात,सुनिता ढोकणे,गिताजंली गोसावी,प्राजंली फरकाडे, पल्लवी गावडे,प्रविणा दिघे, रत्नाकर सोनवणे,ज्ञानदेव माळी,राजू पेटारे, रामदास साबळे यांनी केले.

       इ.५ वी ते १० अखेर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी क्रीडा महोत्सवात सहभाग घेऊन क्रीडा महोत्सवाचा आनंद घेतला.

   क्रीडा महोत्सवात इ.५ वी,६ वी साठी फनी गेम्स,इ.७ वी,८ वी साठी क्रिकेट, आणि इ.९ वी १०साठी या खेळांचे आयोजन करण्यात आले होते.

     या सामन्यांचे पंच म्हणून विद्यालयाचे गुरुकुल प्रमुख सच्चिदानंद झावरे,भारत कोहकडे,वैभव वसावे, सुमेध शिंदे यांनी काम पाहिले.

      हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संकुलातील सर्वच सेवकांचे सहकार्य लाभले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.