शनिवारी बेलगांव येथे श्री रेणुकाई देवी यात्रेनिमित्त लावणी सम्राज्ञी मयुरी उतेकर यांचा कार्यक्रम

 

शनिवारी बेलगांव येथे श्री रेणुकाई देवी यात्रेनिमित्त लावणी सम्राज्ञी मयुरी उतेकर यांचा कार्यक्रम

*****************************




****************************

आष्टी ( प्रतिनिधी)

आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील श्री रेणुकाई देवी यात्रा उत्सवास शनिवार दि.१४ डिसेंबर दत्तजयंतीपासून प्रारंभ होत आहे.हा उत्सव तीन चालतो या यात्रा उत्सवात पहिल्या दिवशी संध्याकाळी रेणुकाई देवीची पालखी मिरवणूक (छबीना) मोठ्या उत्साहात होते तर रात्री ७ वाजता मुंबई येथील प्रसिद्ध डान्सर लावणी सम्राज्ञी मयुरी उतेकर यांचा कार्यक्रम होणार असून यावेळी प्रमुख आकर्षण म्हणून केबी लाईट्स,डीजेविनय,रेणुकाई साउंड असणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी रविवार दि.१५ डिसेंबर रोजी कुस्त्यांचा भव्य आखाडा होणार आहे. 

         बेलगांव ग्रामस्थ दरवर्षी रेणुकाई यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात.

राज्याच्या कानाकोपऱ्यातुन भाविक -भक्त ,मल्ल या भव्य यात्रा व कुस्ती हंगामाला हजेरी लावतात. ग्रामस्थांकडून देवीच्या परिसरात निसर्गरम्य वातावरणात दरवर्षी ही यात्रा भरवली जाते.भाविकभक्तांनी रेणुकादेवीच्या यात्राउत्सव व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच,उपसरपंच, ट्रस्टअध्यक्ष,ग्रामपंचायत,बेलगाव ग्रामस्थ व रेणुकाई देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.