आष्टी येथील कन्या प्रशालेतील श्रीमती मिर्झा संजिदा बेग यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न

 आष्टी येथील कन्या प्रशालेतील श्रीमती मिर्झा संजिदा बेग यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न



आष्टी - (प्रतिनिधी) नियतवयोमानानुसार वयाची ५८ वर्ष पूर्ण झाल्यामुळे जिल्हा परिषद कन्या प्रशाला आष्टी येथील ज्येष्ठ शिक्षिका, प्राथमिक पदवीधर शिक्षिका, आदर्श शिक्षिका, श्रीमती मिर्झा संजिदा लतीफ बेग यांचा बुधवार दिनांक ४ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हा परिषद कन्या प्रशाला आष्टी येथे सेवापुर्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.



               सेवापूर्ती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. सुजाता झगडे मॅडम ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मणराव रेडेकर, डॉ. नदीम शेख, सेवानिवृत्त मुख्याध्यापक शेख नईम, आष्टी नं. १ केंद्राचे मुख्याध्यापक सुरेश पवार, कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक आबासाहेब खताळ, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे उपाध्यक्ष अशोक लटपटे, पांढरी शाळेचे मुख्याध्यापक पद्मनाथ गर्जे, शेख अफजल, पंडित सर, वर्धमाने सर, शेख अज्जूभाई, शेख हारुन भाई, शेख एजाज भाई, मुद्दशीर पठाण, शेख शाहीद, पठाण साजेद, पठाण माजेद, श्रीपाद बळे, शाहीन पठाण मॅडम, आवेज शेख, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या श्रीम. अश्विनी घालमे, श्रीम. उज्वला धोत्रे, श्रीम. जयश्री धोंडे, श्रीम. भाग्यश्री देशपांडे आदी उपस्थित होते.



 याप्रसंगी शाळेस भेट देण्यासाठी आलेले अधिकारी नागनाथ शिंदे साहेब (जि. प. बीड शिक्षणाधिकारी मा. ), सुधाकर यादव साहेब (गटशिक्षणाधिकारी पं. स. आष्टी) यांनी श्रीमती मिर्झा संजिदा मॅडम यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी आव्हाड यांनी केले. यावेळी जि. प. कन्या प्रशाला आष्टी यांच्या वतीने श्रीमती मिर्झा संजिदा मॅडम यांचा सपतीक सत्कार करण्यात आला तसेच स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्थेच्या वतीने उपाध्यक्ष अशोक लटपटे, संचालक आप्पासाहेब काळे यांनी पतसंस्थेचे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला तसेच आष्टी नंबर एक केंद्राच्या वतीने मुख्याध्यापक सुरेश पवार व शाळेतील सर्व शिक्षक यांच्या वतीने श्रीमती संजिदा बेग यांचा सत्कार करण्यात आला.



  यावेळी कौटुंबिक स्नेह असलेले शेख नईम सर, श्रीमती लतिका तरटे मॅडम, श्रीमती आशा शिंदे मॅडम, शेख अल्ताफ व श्रीमती शेख नय्यर मॅडम, अफजल शेख व मिनाज शेख मॅडम यांनी तसेच डॉ. रिझवाना शेख व डॉ. नदीम शेख तसेच पंडित सर, वर्धमाने सर व  मिर्झा संजिदा मॅडम यांच्या नातेवाईकांनी त्यांचा व्यक्तिशः सत्कार केला. 

      याप्रसंगी कु. आरोही पंडित, कु. स्वराली सोले, शाहीन पठाण मॅडम, श्रीम. आशाताई शिंदे मॅडम, श्रीम. लतिका तरटे मॅडम, आदर्श शिक्षक सतीश दळवी, डॉ. नदीम शेख, अशोक लटपटे, लक्ष्मणराव रेडेकर सर यांनी आपली मनोगते व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी श्रीमती मिर्झा संजिदा लतिफ बेग मॅडम यांनी सर्वांचे आभार मानून आपले मनोगत व्यक्त केले.

               सेवापुर्ती सोहळ्याच्या अध्यक्षांची निवड आप्पासाहेब काळे यांनी तर त्यास अनुमोदन राजेंद्र शेळके यांनी दिले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन आदर्श शिक्षक राजेंद्र लाड यांनी केले तर आदर्श शिक्षक देविदास शिंदे यांनी आभार मानले. शेवटी जिल्हा परिषद कन्या प्रशाला आष्टी, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आष्टी नं. १, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दू आष्टी येथील सर्व विद्यार्थ्यांना व आलेल्या सर्व पाहुण्यांना सुरुची जेवण देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सेवापुर्ती सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.