हंबर्डे महाविद्यालयाच्या पाच हँडबॉल खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

 *हंबर्डे महाविद्यालयाच्या पाच हँडबॉल खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड*



*दिनांक:१० ते १७ डिसेंबर २०२४ दरम्यान लुधियाना (पंजाब)येथे होणाऱ्या ६८ व्या आंतरशालेय राष्ट्रीय हँडबॉल क्रीडा स्पर्धा-२०२४-२५ करिता आष्टी येथील अँड.बी.डी.हंबर्डे महाविद्यालयाच्या पाच खेळाडूंची निवड करण्यात आली.या अगोदर दिनांक १२ ते १४ नोव्हेंबर २०२४ रोजी संपन्न झालेल्या आंतरशालेय राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत अँड. बी.डी.हंबर्डे महाविद्यालयाच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला होता या स्पर्धेतून अनुक्रमे पाच खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंचे दिनांक ०५ ते ०९ डिसेंबर २०२४ पर्यंत श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे प्रशिक्षण शिबिर होणार असून नंतर संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी पंजाबला रवाना होईल.या संघात हंबर्डे महाविद्यालयाच्या राजेंद्र कानडे .अनुज संतोष शिंदे. चेतन अर्जुन राठोड. गणेश सुनील कोळेकर. सुमित अनिल या पाच खेळाडूंची  महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली.खेळाडूंच्या या यशाबद्दल आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे आदरणीय अध्यक्ष मा.श्री किशोर नाना हंबर्डे सचिव श्री अतुल काका मेहेर डॉ.गणेशजी पिसाळ साहेब श्री दिलीप शेठ वर्धमाने काका डॉ.गायकवाड साहेब प्रा. महेश चवरे श्री सुभान शेठ सर्व सन्माननीय संचालक मंडळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे सर उपप्राचार्य डॉ. बाबासाहेब मुटकुळे सर प्रा. अविनाश कंदले सर कार्यालयीन अधिक्षीका श्रीमती जाधव मॅडम सर्व प्राध्यापक बंधू शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले या खेळाडूंना प्रा.डॉ.संतोष वनगुजरे प्रा.माधव चव्हाण प्रा.किरण निकाळजे,अनिकेत निकाळजे यांचे मार्गदर्शन लाभले


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.