महाराष्ट्र राज्याच्या सेवेसाठी पुन्हा एकदा आलेल्या बाहुबली देवाभाऊंचे आष्टी मतदारसंघात जयघोषात जोरदार स्वागत,अभिनंदन आणि आनंदोत्सव..

 महाराष्ट्र राज्याच्या सेवेसाठी पुन्हा एकदा आलेल्या बाहुबली देवाभाऊंचे आष्टी मतदारसंघात जयघोषात जोरदार स्वागत,अभिनंदन आणि  आनंदोत्सव..




आ.सुरेश धस समर्थकांचा जल्लोष 





आष्टी (प्रतिनिधी) पाच वर्ष सलग मुख्यमंत्रीपदी राहून विक्रम केलेले देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा येईन असे म्हटले होते परंतु काहींनी केलेल्या गद्दारी करून त्यांना मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवण्यात आले परंतु मी पुन्हा येईन असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा धुव्वा उडवून, संपूर्ण बहुमत मिळवून महायुतीचे सरकार महाराष्ट्र राज्यात स्थापन केले आहे महाराष्ट्र राज्यातील बहिणींचे लाडके भाऊ ठरलेले देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत..

 विधानमंडळ भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये सर्वानुमते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची गटनेता म्हणून निवड झाल्याची बातमी दूरदर्शन झळकली आणि भा ज.पा.चे आ.सुरेश धस यांच्या समर्थकांनी आष्टीत आनंदोत्सव साजरा केला

       महाराष्ट्राच्या हितासाठी नेहमी तत्पर असलेले महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्व मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महायुतीचे मुख्यमंत्री शिवसेनेचे एकनाथजी शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यमंत्री अजित पवार आणि मित्र पक्षांना बरोबर घेऊन विधानसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व ऐतिहासिक यश मिळवले भारतीय जनता पक्ष विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी व आमदार सुरेश धस मित्र मंडळाच्यावतीने घोषणाबाजी तोफा वाजवत स्वागत केले आनंदोत्सव साजरा करत बाहुबली देवाभाऊ यांना मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या.

       यावेळी माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे, उपनगराध्यक्ष शैलेश सहस्रबुद्धे,गणेश शिंदे, संदीप खकाळ,गटनेते किशोर दरेकर, नगरसेवक शरीफ शेख,अरुण निकाळजे, विनोद रोडे, दीपक निकाळजे,संतोष मुरकुटे मनोज सुरवसे, इर्शान खान,रघुनाथ आवारे,जालिंदर पोकळे,संजय मुळे,नितीन आवारे,ज्ञानेश्वर राऊत,संभाजी भांगे,प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.