वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या निवडी जाहीर - अध्यक्षपदी सतीष सोनवणे तर सचिवपदी महेश सदरे यांची निवड

 वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या निवडी जाहीर 
- अध्यक्षपदी सतीष सोनवणे तर सचिवपदी महेश सदरे यांची निवड 






वडवणी / प्रतिनिधी 

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री.एस.एम.देशमुख यांच्या आदेशानुसार व डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बीड जिल्हाध्यक्ष विशाल सोळुंके यांच्या सुचनेनुसार नुकत्याच वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषद तालुका कार्यकारिणीच्या निवडी जाहीर करण्यात आल्या असून या मध्ये जेष्ठ मार्गदर्शक म्हणून पत्रकार सुधाकर पोटभरे,तालुका अध्यक्षपदी पत्रकार सतीष सोनवणे, सचिवपदी पत्रकार महेश सदरे, उपाध्यक्ष पदी पत्रकार धम्मपाल डावरे, कोषाध्यक्ष पदी पत्रकार वाजेद पठाण यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या जात आहेत.


याबाबत अधिक वृत्त असे की, वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यकारणी निवडी बद्दल अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री.एस.एम.देशमुख यांच्याकडे माहिती देण्यात आली होती. त्यांच्याच आदेशानुसार व उपस्थिती मध्ये आणि डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली व बीड जिल्हाध्यक्ष विशाल सोळुंके यांच्या सुचनेनुसार नुकतीच एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून तालुका स्तरावर परिषदेचे उपक्रम राबविण्याबरोबरच वरिष्ठांच्या आदेशानुसार कामकाज केले जावे. अशा सुचना देण्यात आल्या. मुख्य विश्वस्त श्री.एस.एम.देशमुख यांच्या उपस्थितीत डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी या बैठकीत पदाधिकारी निवडी संदर्भात विषय मांडला. त्यानुसार तालुका स्तरावर परिषदेचे मार्गदर्शक म्हणून पत्रकार सुधाकर पोटभरे, तालुका अध्यक्षपदी पत्रकार सतीष सोनवणे, सचिवपदी पत्रकार महेश सदरे, उपाध्यक्ष पदी पत्रकार धम्मपाल डावरे, कोषाध्यक्ष पदी पत्रकार वाजेद पठाण यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. या निवडी नंतर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री.एस.एम.देशमुख यांच्या हस्ते व डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.