डॉ.अभय शिंदे द्वारा इंग्रजी अनुवाद हा माझा आणि माझ्या कवितांचा सन्मान आहे- सय्यद अल्लाउद्दीन

 डॉ.अभय शिंदे द्वारा इंग्रजी अनुवाद हा माझा आणि माझ्या कवितांचा सन्मान आहे- सय्यद अल्लाउद्दीन



आष्टी प्रतिनिधी -आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ॲड. बी.डी. हंबर्डे महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख,साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.अभय शिंदे यांनी माझ्या 'झिंदाबाद...मुर्दाबाद' कविता संग्रहातील निवडक कवितांचा इंग्रजी अनुवाद 'faces behind masks' हे शीर्षक पुस्तक रूपाने दिनांक 01 जानेवारी 2025 रोजी नववर्ष कविता उत्सवात संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे यांच्या हस्ते प्रकाशित होत आहे. या पुस्तकासाठी किशोर नाना हंबर्डे आणि प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांच्या मौलिक शुभेच्छा लाभलेल्या आहेत. पुस्तकाच्या मलपृष्ठावर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ख्यातनाम साहित्यिक, अभिनेता गिरीश कर्नाड यांच्या हस्तलिखित कवितासंग्रह वाचून मांडलेला अभिप्राय पाठराखणीला आहे. कवी सय्यद अल्लाउद्दीन यांच्या कुसुमाग्रज पुरस्कार प्राप्त या संग्रहातील... 'कोण म्हणतो लोकशाही आलीच नाही..' या कवितेने महाराष्ट्रभर ख्याती मिळवून दिली. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज, भालचंद्र नेमाडे, कवी ग्रेस, समाजसेवक अण्णा हजारे,मंगेश पाडगावकर, रानकवी ना.धों.महानोर,माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील, प्रख्यात अभिनेता निळू फुले यांनी ही कविता मन लावून ऐकली होती. शिवाय तीन वेळा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वन्स मोअर झाली आहे. या 'झिंदाबाद... मुर्दाबाद' कविता संग्रहातील निवडक कवितांचा इंग्रजी अनुवाद डॉ.अभय शिंदे द्वारा पुस्तक रूपाने वाचकांसाठी येत आहे. हा माझा आणि माझ्या कवितांचा सन्मान आहे. ह्या निमित्ताने जगभरातील साहित्यिक आणि रसिकांपर्यंत माझ्या कविता पोहचतील याचा आनंद वाटतो असे कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.