लोकनेते आमदार सुरेश धस यांना राज्य मंत्रिमंडळात संधी द्यावी-सागर खेडकर, गौतम कर्डिले
कडा-नुकत्याच निवडणुकीत झालेल्या भाजपसह विधानसभेच्या महायुतीने दैदीप्यमान असे यश मिळविले आहे.यामध्ये आष्टी-पाटोदा-शिरूर
विधानसभा मतदार संघातून माजी मंत्री
सुरेश धस यांनी ७८ हजार मताधिक्य घेऊन मोठा विजय संपादन केला आहे.आ.सुरेश धस यांनी यापूर्वी तीन वेळा विधानसभेचे नेतृत्व
आणि एक वेळा लातूर बीड - धाराशिव या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परिषदेमध्ये सुद्धा काम केले असून नव्याने होणाऱ्या मंत्रिमंडळात संधी द्यावी अशी मागणी कडा ग्रामपंचायत सदस्य सागर खेडकर,गौतम कर्डिले यांनी केली आहे.
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांनी आघाडी सरकारच्या काळात त्यांनी महसूल व पुनर्वसन सह अनेक खात्याचे राज्य मंत्रीपद
सुद्धा भूषविले आहे. त्यांनी मंत्रिपदाच्या काळात अतिशय उत्तम असे काम केलेले
आहे.याच दरम्यान उत्तराखंडमध्ये आलेली पूर परिस्थिती असो की मतदार संघात पडलेला दुष्काळ असो अण्णांनी आपल्या कौशल्याचा वापर करून ह्या परिस्थिती उत्तमपणे हाताळलेल्या होत्या. तसेच मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांचे प्रश्न असो की पाणी प्रश्न हा अत्यंत आ. सुरेश धस यांची ग्रामीण भागातील जनतेशी अतिशय घट्ट अशी नाळ जुळली आहे हे कालच्या निकालावरून सिद्ध
होते. मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रश्नांचा त्यांना अत्यंत बारकाईने अभ्यास आहे. आपण वेळोवेळी त्यांच्या सभागृहातील भाषणांमधून पाहिलेच आहे. २००२ साली आष्टी मतदार संघातील ५३ हजार जनावरांना
छावणीच्या वाचवण्याचे कामसुद्धा आ.धस यांनी केले आहे.आष्टी मतदार संघात दहा वर्ष आमदार नसतानाही विकासाचा श्रीगंगा त्यांनी खेचत आणत राहिलेला विकासाचा बॅकलॉग त्यांना भरून काढण्यासाठी पक्षश्रेष्ठीने आमदार सुरेश धस यांना न्याय देऊन कॅबिनेट मंत्री करावे.
stay connected