सोयाबीन हमीभाव खरेदी ऑनलाईन नोंदणीसाठी शेवटची १५ डिसेंबर शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा--सभापती रमजान तांबोळी
***************************
****************************
आष्टी (प्रतिनिधी)
हंगाम २०२४-२५ मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत माजी मंत्री सुरेश धस यांच्या विशेष प्रयत्नाने नाफेडच्यावतीने आष्टी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती कडा येथे शासकीय खरेदी केंद्रावर आवश्यक त्या कागदपत्रांसह ऑनलाईन नोंदणी सुरू झाली ऑनलाईन नोंदणीची शेवटची दि.१५ डिसेंबर रोजी असून शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी यांनी केले आहे .
कडा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे
माजी मंत्री सुरेश धस यांच्या विशेष प्रयत्नाने जामगाव सेवा सोसायटीला शासकीय हमीभाव खरेदी केंद्रांस मंजुरी मिळाली आहे.शेतकऱ्यांनी सातबारा,आधारकार्ड,बँक पासबुक,
सातबारा व आठ अ मूळप्रत ई पीक पाहणी केलेली नोंद इत्यादी कागदपत्रासह प्रत्यक्ष येऊन नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. सध्या खाजगी व्यापारी हमीभावापेक्षा कमी भावाने माल खरेदी करत असून शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन ४८९२ रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळणार आहे.शेतकऱ्यांनी शासकीय हमीभाव सोयाबीन खरेदी योजना २०२४ ची ऑनलाईन करण्याची शेवट तारीख १५ डिसेंबर पर्यंत असून शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन सभापती रमजान तांबोळी यांनी केले आहे.
stay connected