महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घ्यायचा नैतिक अधिकार मविआला नाही
*****************************
आ.सुरेश धस विरोधकांवर बरसले
*****************************
******************************
आष्टी (प्रतिनिधी) विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत पराभूत करणाऱ्या काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही असे सांगत नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांना टोला लगावत मविआवर टीकेची जोड उठवली.
महाराष्ट्र विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदन प्रस्तावावर ते बोलत होते.
पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीमध्ये घटना बदलणार हा फेक निरेटिव्ह तयार करून जनतेची दिशाभूल केली.परंतु महायुतीच्या नेतृत्वाने कमाल केली आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये या सर्वांची धूळधाण केली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आणि उबाठा शिवसेनेचे आमदार एका एसटी बस मध्ये बसणे एवढे देखील निवडून आले नाहीत कारण महाविकास आघाडीचे 50 देखील आमदार निवडून आलेले नाहीत. वास्तविक पाहता 53 सिटाची एस टी बस असते परंतु एस टी भरेल एवढ्या जागा देखील महाविकास आघाडीच्या आल्या नाहीत.त्यामुळे त्यांनी शांत राहावे म्हणत हऱ्या नाऱ्याची गोष्ट सांगत आता महायुतीचं कसं होईल असा प्रश्न पडणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची तुलना त्यांनी हऱ्या आणि नाऱ्या यांच्या गोष्टीशी करून सभागृहात निर्माण केला आणि विरोधकांना चांगलेच धारेवर धरून विधानसभेच्या पहिल्याच विशेष अधिवेशनात आ.सुरेश धस विरोधकांवर चांगलेच बरसले.
अत्यंत चाणक्य बुद्धिमत्ता असलेले आणि कायदे पंडित असलेले राहुल नार्वेकर यांनी अति अत्यंत चांगला रामशास्त्री प्रभुणे बाण्याने विधानसभेचे सभागृह चालवले विरोधकांच्या बेकायदेशीर वक्तव्यांना देखील त्यांनी सहन केले महाविकास आघाडीचा सकाळी नऊ वाजता वाजणारा भोंगा आणि पक्षप्रमुख यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली ही अत्यंत निंदनीय बाब असल्याचे सांगत विरोधकांवर टीकेची जोड उठवली.
सोमवारी विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा तिसरा आणि शेवटचा दिवस होता.गेल्या दोन दिवसांपासून जवळपास सर्व आमदारांनी शपथ घेतल्यानंतर सोमवारी विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.यावेळी नार्वेकर यांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना आ.सुरेश धस यांनी आपल्या अस्सल ग्रामीण भाषेत नुकत्याच विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या महाविकास आघाडीने आता शांत राहाव असे सांगत राहुल नार्वेकर यांनी आजपर्यंत विधानसभेचे अध्यक्ष म्हणून आपली चोख भूमिका पार पाडली आहे.स्वतः वकील असल्याने त्यांना कायद्याचा अभ्यास आहे ते योग्यरीत्या सभागृह चालवतील आणि प्रत्येकाला बोलण्याची संधी ते देतील असा विश्वास आ.धस यांनी व्यक्त केला.तर दुसरीकडे विरोधकांची निवडून आलेल्या आमदारांची एकूण बेरीज पाहता एस. टी.देखील भरणार नाही असे म्हणत हऱ्या नाऱ्याची गोष्ट सांगत विरोधकांवर चांगलेच बरसले.त्याच्या याच भाषणाची सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.
stay connected