स्पर्धेच्या युगात अबॅकस शिक्षण काळाची गरज - पूर्व शिक्षण संचालक दिनकर टेमकर अहिल्यानगर येथे पार पडली राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा – देशभरातुन 987 विद्यार्थ्यांचा सहभाग

 स्पर्धेच्या युगात अबॅकस शिक्षण काळाची गरज - पूर्व शिक्षण संचालक दिनकर टेमकर
अहिल्यानगर येथे पार पडली राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा – देशभरातुन 987 विद्यार्थ्यांचा सहभाग





(प्रतिनिधी)- शहरात ग्लोबल व्हिजन फाउंडेशन पुणे संचलित इन्स्पायर अबॅकस ॲण्ड वेदिक मॅथ अकॅडमीच्या वतीने घेण्यात आलेली राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला देशभरातून 987  विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.


 अहिल्यानगर येथील सुखकर्ता लॉन या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली. सकाळच्या सत्रात घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठमोठी गणिते झटपटपणे सोडवून अवघ्या 5 मिनीटाच्या आतमध्ये आपला पेपर सोडवित उपस्थितांना आश्चर्यचकीत केले. 

या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे पूर्व शिक्षण संचालक मा. श्री. दिनकर टेमकर हे होते. 

टेमकर साहेबांनी आपल्या मनोगत व्यक्त करतांना स्पर्धेच्या युगात अबॅकस शिक्षण ही काळाजी गरज आहे. शालेय शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांचा गणित हा विषय सोपा करणेसाठी त्यांना अबॅकस शिक्षण फायद्याचे ठरते असे ते म्हणाले. देशभरातील विद्यार्थ्यांची ही गरज इन्स्पायर अबॅकस ॲण्ड वेदिक मॅथ अकॅडमी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण असे अबॅकस व वैदिक गणिताचे शिक्षण देऊन अतिशय यशस्वीपणे पूर्ण करत आहे असे त्यांनी सांगितले.


या अबॅकसच्या राष्ट्रीय स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळविलेले सुजय थोरात, वेदिका ठोकळ, समृध्दी जगताप व नैवेद्य गुणवंत या  विद्यार्थ्यांना अकॅडमीच्या वतीने प्रत्येकी 3 हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.

   

  राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी आराध्या गवते, कार्तीक इंगळे, धनुष राऊत, प्रिया शेळके, संस्कृती पाटील, संस्कृती गावडे, मेघराज तांबे, सुजय थोरात, वेदिका ठोकळ, समृध्दी जगताप, मिताली जगताप, शिवराज मोरे, ओम पवार, आरुष होले, वेदांत गोरे, आराध्या मते, श्रेया रकटाटे, श्लोक कासार, आकांक्षा महांडुळे, ईशिका शिंदे, नैवेद्य गुणवंत, प्रांजली पवार, रिध्दी कासार, शर्विल पवार व आरोही राऊत  या विद्यार्थ्यांना चॅम्पियन ट्रॉफीचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.


यावेळी अकॅडमीमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विद्यार्थी घडविण्याचे कार्य करणाऱ्या वंदना वाळके, अश्विनी रकटाटे या शिक्षिकांना टू स्टार अवार्ड तसेच कोमल कर्डुळे, सोमनाथ बोचरे यांना स्टार टिचर अवार्ड तसेच हिना शेख, जयमाला भाकरे, किर्ती देशमुख, पल्लवी तांबट, प्रियंका शिरसाठ व मोनिका तांबे या शिक्षिकांना बेस्ट टीचर अवॉर्ड देऊन सन्मानीत करण्यात आले. 


या कार्यक्रमाप्रसंगी आष्टी पंचायत समितीचे माजी उपसभापती गोपाळभाऊ रकटाटे, श्रीगोंदा माजी कृषी अधिकारी बलभिम शेळके, अर्थ व बांधकाम विभागाचे माजी सभापती बाळासाहेब हराळ, कराड येथील उपविभागीय डाक अधिकारी अमित देशमुख, अ. नगर जि. प. माध्य. शिक्षण विभाग अधिक्षक महावीर धोदाड, आष्टी पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी सीमाताई काळे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, रयत शिक्षण संस्थेचे सदस्य ज्ञानदेव पांडळे, गुरुदेव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संतोष मगर, महाराष्ट्र राज्य पोस्टल संघटना अध्यक्ष संतोष यादव, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष अहिल्यानगर दक्षिण च्या जिल्हाध्यक्षा आशाताई निंबाळकर,  विद्याताई यादव, छायाताई मगर, जयसिंग कारखिले, शरद वाळके, गर्जेंद्र राठोड, संदीप डावरे, ज्योतीताई सुपारे, महादेव भद्रे, कमलेश मिरगणे, गौतम पठारे, श्रीलता आडेप, रंजनाताई उकीरडे, सुषमाताई पडोळे, साधनाताई बोरुडे, आशाताई गायकवाड, सुनिल पावसे, आनंद गिरवले, अजिंक्य हंकारे, अजय पायाळ, विद्या यादव, महेश वारे, प्रा. सुनिल शेंडगे, नितीन कर्डुळे, सितारात सारंग, नामदेव रकटाटे, नामदेव पाटील वाळके, नितीन पठारे, श्रीराम शेळके आदींसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अकॅडमीच्या अध्यक्षा अर्चना शेळके,  सचिव दादासाहेब शेळके,  संचालक रविंद्र रकटाटे, जय शेळके, श्रीतेज रकटाटे व सर्व शिक्षक वर्गाने कठोर परीश्रम घेतले. 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले. प्रास्ताविक संस्थेचे सचिव दादासाहेब शेळके यांनी आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक रविंद्र रकटाटे यांनी मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.