कार्यानुभव उपक्रमातून प्रकल्प : शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून तर विविध आजारांवर उपयोगी आळंबी Agro products

 कार्यानुभव उपक्रमातून प्रकल्प : शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून तर विविध आजारांवर उपयोगी आळंबी 




श्री. छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालयामध्ये आळंबी उपक्रम सुरू


आष्टी प्रतिनिधी


आष्टी येथील श्री. छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालयात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी  कार्यानुभव शिक्षण उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये आळंबी उत्पादन तंत्रज्ञान, रेशीम उद्योग, भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान व व्यावसायिक कुक्कुटपालन उत्पादन या उपक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. 

या कार्यानुभव शिक्षण उपक्रमातून महाविद्यालयातील ऋतिक आढाव, मोहन पवळ, अनारसे स्मिता, बचकलवाड कार्तिक, भवर अक्षय, भोंडवे शिवम, चव्हाण अभिषेक, चव्हाण रोहित, देवकर अभिषेक, गाढवे विकास, गरुड सुजल, गरुड सिद्धार्थ, गीत्ते ऋतुजा, जायभाय रोहिणी, कानडे विशाल, लकाळ वैष्णवी, मगर संग्राम, मारकळ प्रसाद, मेहेर कृष्णा, मुंडे अभिषेक, निकाळजे आकांक्षा, पाटील पवन, राऊत अदिती, राऊत विजय, साबळे शिवम, सानप श्रीकृष्ण, सय्यद अरबाज, शेळके प्रथमेश, शिंदे प्रणव, सोले निकिता, वनवे गणेश, वंजारी भुवन, वारंगणे, वनवे ऋषिकेश आणि मिटकर सौरभ या विद्यार्थ्यांची आळंबी उत्पादन तंत्रज्ञान प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे. 

प्राचार्य डॉ. श्रीराम आरसूळ यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आळंबी पिकाची माहिती देताना प्रमुख मार्गदर्शक प्रा. महेश साबळे म्हणाले आळंबी प्रक्रिया  उत्पादनाला मोठा वाव असून, याचा फायदा उत्पादकांना होणार आहे. आळंबी म्हणजे बुरशी प्रवर्गातील आहारात अन्न म्हणून उपयोगी असून या बुरशीची वाढ पूर्ण झाल्यानंतर यास फळे येतात व या फळास आळंबी किंवा भूक्षत्र असे म्हणतात. 

आळंबीचे निसर्गात अनेक प्रकार असून भिंगरी आळंबी, शिंपला आळंबी किंवा बटन आळंबी असे संबोधले जाते.  शेतकरी बंधू जोडधंदा म्हणून हा व्यवसाय करू शकतात. आळंबीतील प्रथिनामध्ये शरीरात पोषक व आवश्यक त्या सर्व अमिनो आम्लांचा समावेश असून ती भाजीपाल्यातील प्रथिनांपेक्षा उच्चप्रतीची व वजनाला हलके असतात. 



आळंबीतील विविध गुणधर्माचा लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कर्करोग, फुफ्फुसाचे रोग, विषाणूजन्य व जिवाणूजन्य रोग प्रतिबंधास उपचारात विशेष उपयोग होतो. त्यामुळे आळंबीला हेल्थ फूड म्हणून आहारात महत्त्वाचे स्थान आहे, असेही प्रा. महेश साबळे यांनी सांगितले. तसेच या उपक्रमास कृषी कीटकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. पोपट काळे, कृषी अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.  बाबासाहेब गुंडाळे, कृषी विस्तार शिक्षण विभाग प्रमुख प्रा. इर्शाद तांबोळी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. 

कार्यानुभव शिक्षण उपक्रम चालू केल्यानंतर प्रशासन अधिकारी  डॉ. डी. बी. राऊत ,प्राचार्य डॉ. श्रीराम अरसुळ यांनी स्वागत केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.