अनिस डीफेन्स करिअर इन्स्टिट्यूट विश्रांतवाडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने इन्स्टिट्युट च्या प्रांगणावर ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
Vdo पहा
या प्रसंगी अनिस डीफेन्स करिअर इन्स्टिट्युट चे सर्व शिक्षकवर्ग, विद्यार्थी व पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी प्रगतशिल शेतकरी व समाजसेवक झाकीर जमादार हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते श्री . झाकीर जमादार यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. ध्वजारोहन प्रसंगी इन्स्टिट्युट चे संस्थापक अध्यक्ष श्री. अनिस कुट्टी सर, कॅप्टन. आर.के. पवार (सेवानिवृत्त), प्रा. फराना मॅडम, निकाळजे सर आदि मान्यवर उपस्थित होते.
त्यानंतर विदयार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले. यात विदयार्थी साहील मोटे यांनी प्रजासत्ताक दिनाविषयी मनोगत व्यक्त केले. व इतर विद्यार्थ्यांनी संचलन परेड, देशभक्ती गीत समुहगीत सादर केले.
यानंतर विदयार्थी कु. साहिल मोटे याने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटविल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्याला प्रशस्तिपत्रक व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विद्यार्थी कुमार युशा खतिब यानेही राज्यस्तरीय कीक बॉक्सींग मध्ये प्रथम क्रमांक व गोल्ड मेडल पटकावले व त्याची राष्ट्रस्तरीय निवड झाल्याबद्दल त्यालाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. आणि इन्स्टिट्युट मध्ये अकॅडमी कॅडेट कॅप्टन पदी कु. ओम पाखले व अॅकॅडमी कॅडेट अॅड्जोटंट पदी कुमारी ज्ञानेश्वरी पाटील यांची निवड करण्यात आली.
अनिस डीफेन्स करीअर इन्स्टिट्युट मागीला ३६ वर्षांपासून कार्यरत असून आतापर्यंत ६५० पेक्षा अधिक विदयार्थी भारतीय संरक्षण क्षेत्रात अधिकारी पदावर रुजु झाले. नुकत्याच २०२४ मध्ये पार पडलेल्या परिक्षेत NDA साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना व NDA साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींनी शुभेच्छा देऊन कार्यक्रम आनंदमयी वातावरणात संपन्न झाला.
stay connected