केंद्रप्रमुख सुनिता उगले यांची शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती Ashti News

 केंद्रप्रमुख सुनिता उगले यांची शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती

-------------------------------------------


 

-----------------------------------------

आष्टी ( प्रतिनिधी)

आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या जामगाव केंद्राच्या केंद्रप्रमुख सुनिता उगले यांची शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे. श्रीमती सुनिता दादाहरी उगले या १९८५ मध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागात सहशिक्षिका म्हणून पाटोदा येथे रुजू झाल्या.त्यानंतर त्यांची आष्टी कन्या शाळा येथे बदली झाली.  प्राथमिक पदवीधर शिक्षिका झाल्यावर  केंद्रप्रमुख म्हणून त्यांची पदोन्नती झाली.जामगाव केंद्राच्या त्या केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत होत्या त्याचबरोबर मागील काही काळ बेलगाव केंद्राचा देखील त्यांच्याकडे पदभार होता.नुकतीच त्यांची शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे.गट शिक्षणाधिकारी कार्यालय आष्टी येथे त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या पदोन्नतीबद्दल गटशिक्षण अधिकारी सुधाकर यादव,सर्व शिक्षण विस्तार  अधिकरी ,कर्मचारी, तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी, पालक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.