नॅक पुनर्मूल्यांकनात भगवान महाविद्यालयाला मिळाला B++ ग्रेड
आष्टी प्रतिनिधी- येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या भगवान (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालयास नुकतेच 'राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद(NAAC), बेंगळुरू' या संस्थेचे B++(CGPA 2.82) असे मानांकन मिळाले आहे. १६ व १७ जानेवारी या कालावधीमध्ये महाविद्यालयास भेट देऊन आपला अहवाल परिषदेस पाठवला होता. या पीअर टीमध्ये प्रोफेसर रमेश कुमार (प्र. कुलगुरू, बिहार विद्यापीठ, पाटणा) अध्यक्ष, प्रोफेसर ईश्वरचंद्र पंडित (बडोदा विद्यापीठ, गुजरात) समन्वयक, प्रोफेसर जतींदर बीर सिंह (प्राचार्य, कॉमर्स कॉलेज, दिल्ली) सदस्य यांचा समावेश होता.
या भेटीदरम्यान पीअर टीमने सर्व विभागांना भेटी देऊन संस्थेचे व्यवस्थापन मंडळ, विद्यमान व माजी विद्यार्थी तसेच पालक व महाविद्यालयाचा संपूर्ण स्टाफ यांच्याशी संवाद साधून महाविद्यालयाने प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ व समन्वयक प्रा बाबासाहेब झिने यांचे नेतृत्वाखाली केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. या संदर्भात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष महाविद्यालयास मदत करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचे प्राचार्यांनी आभार व्यक्त केले.
या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भीमराव धोंडे, सहसचिव डॉ. अजय धोंडे सर्व प्रशासकीय अधिकारी व समाजातील विविध घटकांनी प्राचार्य, समन्वयक आणि सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.
stay connected