कॉ.पी.बी.कडू पाटील यांचे कार्य निरपेक्ष आणि प्रेरणादायी-मा.चंद्रकांत दळवी
सात्रळ ..
थोर स्वातंत्र्यसेनानी सेनानी कॉ.पी.बी.कडू पाटील आपल्या सामाजिक व राजकीय जीवनात काम करताना स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही.फक्त समाजासाठी आणि स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी हयात आयुष्यभर चंदनासारखे आयुष्य झिजवले म्हणूनच त्यांचे कार्य आणि व्यक्तीमत्व निरपेक्ष आणि प्रेरणादायी होते; आप्पांचा शैक्षणिक व सामाजिक कार्याचा वारसा अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील यांनी समर्थपणे पुढे सुरु ठेवला आहे.असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवीसाहेब यांनी केले.
सात्रळ ता. राहुरी येथील कॉ.पी.बी.कडू.पाटील समाजक्रांती पुरस्कार व मातोश्री शांताबाई पुंजाजी कडू पाटील स्मृती पारितोषिक वितरण समारंभ आणि कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालयाच्या नूतन इमारत भूमिपूजन समारंभात ते बोलत होते.त्याचबरोबर Artificial intelligence बदल होणे ही काळाची गरज आहे.तसेच interactive panel द्वारे विद्यार्थ्यांना रयत शिक्षण संस्थेने शिक्षण सुरु केल्यामुळे रयतचा विद्यार्थी स्मार्ट बनत चालला आहे.असे मत रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन ॲड.भगीरथजी शिंदे,कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अध्यक्ष कॉग्रेस पार्टी रायगड जिल्हा-महेंद्र शेठ घरत,सचिव रयत शिक्षण संस्था सातारा, विकासजी देशमुख- कुलगुरु,कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ,प्राचार्य डॉ.ज्ञानदेव म्हस्के,चेअरमन बांधकाम समिती रयत शिक्षण संस्था मा.प्रकाश निकम पाटील आदि मान्यवरांच्या शुभहस्ते रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील,थोर स्वातंत्र्यसेनानी,माजी आमदार कॉ.पी.बी.कडू पाटील तथा आप्पा तसेच मातोश्री शांताबाई पुंजाजी कडू पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
थोर स्वातंत्र्यसेनानी कॉ.पी.बी.कडू पाटील स्मृत्यर्थ समाजक्रांती पुरस्काराचे मानकरी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी रामशेठ ठाकूर यांच्या अनुपस्थितीत मा. महेंद्र शेठ घरत यांनी समाज क्रांती पुरस्काराचा रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या शुभहस्ते स्विकारला.
यावेळी महेंद्र शेठ घरत यांनी आपले विचार मांडताना "माणसात देव पहा "असे ब्रीदवाक्य आचरणात आणून दैनंदिन जीवनात अखंड समाजसेवाचे व्रत थोर देणगीदार मा. खासदार रामशेठ ठाकूर असून रयत शिक्षण संस्थेच्या कार्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागताबरोबर पंकज कडू पाटील यांनी प्रमुख अतिथीचा परिचय करून दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. भगीरथ शिंदे होते. त्यांनी आपल्या मनोगतातून विचार मांडताना कर्मवीर भाऊराव पाटील व कॉ. पी. बी. कडू पाटील यांच्या भेटीची आठवण करून देत कडू पाटील यांनी ग्रामीण भागात "रयत"च्या उभारणीस केलेल्या योगदानाची माहिती देताना आप्पांचे कौतुक केले. आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आपले विचार मांडले.तसेच डॉ राजीव शिंदे यांनीही आपले विचार थोडक्यात व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, मीनाताई जगधने-सदस्य मॅनेजिंग कौन्सिल रयत शिक्षण संस्था सातारा, उत्तर विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहाय्यक अधिकारी प्रमोद तोरणे,माजी विभागीय अधिकारी भाऊसाहेब शिरसाठ, बाबा आरगडे, एकनाथ पाटील घोगरे, प्राचार्य गहिनीनाथ विखे,ॲड विजयराव कडू पाटील प्राचार्य राजेंद्र बडे, कन्या विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक दिलीप माळी आदि मान्यवर उपस्थित होते.
मातोश्री शांताबाई पुंजाजी कडू पाटील स्मृती पारितोषिक वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या कृतीशील मुख्याध्यापक,उपक्रम शिलशिक्षक, गुणवंत शिक्षिका आणि स्वच्छ सुंदर शाळा पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
यावेळी मंगेश वडजे, रमेश पुलाटे, सुभाष टेकाळे,हंसराज मते,कै.लक्ष्मण डावखर यांच्या स्मरणार्थ सौ.अर्चना दिघे,भाऊसाहेब जाधव,श्री.जगधनी,पोपटराव दिघे अशा अनेक दानशूर व्यक्तींनी कॉ.पी.बी.कडू पाटील फौंडेशनच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी देणगी प्रदान केल्याबद्दल दानशूर व्यक्तींचा मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.मंगेश कडलग आणि विलास गभाले यांनी केले तर आभार प्रदर्शन रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग अहिल्यानगरचे विभागीय अधिकारी नवनाथ बोडके यांनी मानले.
कार्यक्रमास रयतच्या उत्तर विभागातील जनरल बॉडी सदस्य, संस्था पदाधिकारी,माजी रयतसेवक, विविध शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी तसेच ग्रामस्थ, पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
stay connected