व्यक्तिमत्व विकासासाठी वाचन: हरिष हातवटे
आष्टी: ॲड बी डी हंबर्डे महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा आणि स्कूल कनेक्ट 2.0 अभियानात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्तिमत्व विकासासाठी वाचन आवश्यक असल्याचे श्री हरिष हातवटे यांनी सांगितले. यावेळी आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. किशोर हंबर्डे आणि प्राचार्य डॉ एस आर निंबोरे मंचावर उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या स्कूल कनेक्ट 2.0 अभियानाअंतर्गत नविन वर्षाच्या स्वागताबरोबरच वाचन संकल्प आवश्यक असल्याचे श्री हरिष हातवटे यांनी सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ निंबोरे म्हणाले की वाचाल तर वाचाल ह्याचा अर्थ समजून घ्या व ठरवून रोज किमान एक तास वाचन करा. अध्यक्षीय समारोप करताना श्री किशोर हंबर्डे म्हणाले की शरीराला अन्नाची आवश्यकता असते तशी मेंदूला वाचनाची आवश्यकता असते. महाविद्यालयातील पुस्तकांना वाचक मिळत नाहीत ही खंत व्यक्त करून त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज केले. सूत्रसंचालन डॉ अभय शिंदे यांनी केले तर आभार डॉ सखाराम वांढरे ह्यांनी मानले.
stay connected