महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी बीड येथे निवड चाचणी
आष्टी ता ९ (प्रतिनिधी)- अहिल्यानगर येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी रविवारी (ता१२) छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण बीड येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी बीड जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी चाचणी होणार असल्याची अशी माहिती बीड जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पै संभाजी मिसाळ, महाराष्ट्र केसरी पै सईद चाऊस यांनी दिली. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहिल्यानगर येथे होणार आहेत. यासाठी बीड जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी रविवारी सकाळी ९ ते ११ पर्यंत वजन घेण्यासाठी सर्व मल्लांनी उपस्थित रहावे. ११ वाजल्यानंतर प्रत्यक्ष कुस्त्या सुरू होतील.
वरिष्ठ गट राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत २०२४-२५ या स्पर्धेच्या शहर व जिल्हा संघ निवड चाचणी घेण्यात येणार आहे.
तरी स्पर्धेसाठी मेडिकल सर्टिफिकेट व पालकांचे संमत्ती पत्र तसेच मूळ आधार कार्ड व रहिवासी असलेला पुरावा या कागदपत्रासह उपस्थित रहावे असे आवाहन कुस्तीगीर संघांचे अध्यक्ष मा. माजी आमदार भीमरावजी धोंडे, पै संभाजी मिसाळ, पै शिवशंकर कराड, महाराष्ट्र केसरी पै सईद चाऊस, पै जमीर पठाण, पै बाळासाहेब शेंदुरकर, पै दिगंबर गवळी, डॉ शिवाजी मिसाळ, पै जब्बार शेख कुस्तीगीर संघ बीड कार्यकारणी व पदाधिकारी यांनी केले आहे
.
stay connected