स्व.मैनुद्दीन अमिनुद्दीन शेख स्मरणार्थ जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर
-------------------------------------------
स्व.मैनुद्दीन अमिनुद्दीन शेख स्मरणार्थ आदर्श पुरस्कार वितरण तसेच गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण सोहळा रविवार दि. 12 जानेवारी 2025 रोजी जिजाऊ जयंती निमित्त सद्गुरु हॉटेल - हॉल
धामणगाव रोड, मदन महाराज मठासमोर कडा येथे सकाळी 10 वा. आयोजित करण्यात आलेला आहे. सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून आदरणीय तहसीलदार वैशालीताई मँडम या उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे ह. भ. प. बबन महाराज बहिरवाल, जे. शि. वि. अधिकारी आदरणीय मनोज धस साहेब, कडा गावचे सरपंच आदरणीय युवराज दादा पाटील हे उपस्थित राहणार आसून यांच्या शुभहस्ते सन्मान सोहळा पार पडणार आहे.
आदर्श पत्रकार श्री.उत्तम बोडखे साहेब, श्री. बबलूभाई वजीर सय्यद , श्री. अविशांत कल्याण कुमकर, आदर्श शिक्षक पुरस्कार श्रीम. उषाताई ढेरे, श्रीम. वैशालीताई झांजे, श्री. राजेंद्र लाड, श्री. प्रशांत दगडे, श्री. सुनिल अनारसे, आदर्श साहित्यिक - श्री. अनंत कराड, आदर्श डॉक्टर - श्री. डाँ. शेख नदीम साहेब, सौ. डाँ. मंजूषा टेकाडे मँडम, आदर्श सेवक पुरस्कार - श्री. रोकडे शहादेव (मामा)
तसेच गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण होणार आहे. या सन्मान सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आदर्श शिक्षिका तथा सुप्रसिद्ध कवी श्रीमती शेख नजमा मैनुद्दीन श्री समीर सर ,शेख नईम, श्री शेख नदीम यांनी आवाहन केले आहे.
stay connected