शब्दगंधच्या पाथर्डी शाखेची कार्यकारणी जाहीर

 *शब्दगंधच्या पाथर्डी शाखेची कार्यकारणी जाहीर*






पाथर्डी जि. अहिल्यानगर - 

"अलीकडच्या काळामध्ये 15 ते 35 वयोगटातील तरुण-तरुणी साहित्या पासून दूर गेले आहेत, त्यांना पुन्हा साहित्याकडे वळविण्यासाठी समाज माध्यमाला साहित्याचे स्वरूप देऊन प्रवाहित करावे लागेल" असे प्रतिपादन बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. जी.पी ढाकणे यांनी केले.

शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या पाथर्डी तालुका शाखेच्या वतीने आयोजित संमेलन पुर्व तयारी बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पाथर्डी शाखेचे अध्यक्ष अविनाश मंत्री हे होते. यावेळी विचारपीठावर शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी,  अध्यक्ष राजेंद्र उदागे, राज्य संघटक प्रा.डॉ.अशोक कानडे,कार्यवाह भारत गाडेकर,खजिनदार भगवान राऊत,प्राचार्य अशोक दौंड,ज्येष्ठ साहित्यिक डॉ. कैलास दौंड, सुभाष सोनवणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी पाथर्डी तालुक्याची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. 

अध्यक्ष डॉ.राजकुमार घुले, उपाध्यक्ष हुमायून आतार, कार्यकारणी सदस्य सुनीता पालवे, डॉ.संतराम साबळे, संदीप भागवत, डॉ.अशोक डोळस, डॉ.भगवान सांगळे, प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब कोठुळे, सल्लागार डॉ.अनिल पानखडे यांची निवड करण्यात आली.

जिजाऊ मासाहेब, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस अभिवादन करून या बैठकीस प्रारंभ झाला. शाहीर अरुण आहेर यांनी स्वागत गीत सादर केले. यावेळी डॉ.कैलास दौंड, सुभाष सोनवणे, पाथर्डी शाखा अध्यक्ष प्रा. डॉ.राजकुमार घुले, हुमायून आतार यांनी मनोगत व्यक्त केले.. डॉ.अनिल पानखडे यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन डॉ. संतराम साबळे यांनी केले.शेवटी प्रा.डॉ.अशोक कानडे यांनी आभार मानले.

कार्यक्रमास  रवींद्र दानापुरे, बबनराव गिरी,बबन शेवाळे,दिलीप सरसे, प्रशांत रोडी, अनिल खाटेर, राजेंद्र चव्हाण, मकरंद घोडके, जहागीरदार, आरती राठोड आदी उपस्थित होते.

भाऊसाहेब गोरे, अशोक वैद्य, महादेव कौसे, राजेंद्र उदारे यांना कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.