जामीया अबुल हसन चिखली येथील विद्यार्थ्याने मिळवली हाफिज ची पदवी
आष्टी तालुक्यातील जामिया अबुल हसन चिखली या संस्थेच्या हाफीज शाहिद मुफ्ती अब्दुल वाहिद शेख या विद्यार्थ्याने अतिशय कमी कालावधीत पवित्र कुरान शरीफ पाठांतर करून हाफिज ही पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
जामिया अबुल हसन मदरसा चिखली या ठिकाणी सोमवार दिनांक 13 जानेवारी रोजी उलेमांच्या उपस्थितीत हा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मौलाना इजहार साहब हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना युसुफ साहेब करमाळा हे उपस्थित होते तसेच जामिया अबुल हसन चिखली चे संस्थापक मुफ्ती शफी साहेब यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना आणि सूत्रसंचालन केले याप्रसंगी हाफीज शाहिद मुफ्ती अब्दुल वाहिद शेख या विद्यार्थ्याने अतिशय कमी कालावधीत पवित्र कुरान शरीफ चे पाठांतर करून हाफिज ची डिग्री प्राप्त केल्याबद्दल सर्व उपस्थित प्रशिक्षक व उलेमा ए किराम यांनी त्याचा यथोचित सत्कार केला दीड वर्षात त्याने हाफिज कोर्स पूर्ण केला याप्रसंगी त्यांचे प्रशिक्षक मौलाना शाहिद अली तसेच मौलाना अफसर शेख, हाफिज अझहर साहब , मुफ्ती शिराज , मौलाना आदम तसेच मान्यवर मौलानांची उपस्थिती होती. अल्पावधीत जमिया अबुल हसन या मदर्श्यामध्ये उत्कृष्ठ विद्यार्थी घडविण्याचे कार्य केल्याबद्दल उपस्तीतांनी मौलाना मुफ्ती शफीक याचे कौतुक केले.
stay connected